विषारी हिवारच्या शेंगा खाल्ल्याने २४ मेंढ्यांचा मृत्यू   

सातारा : उन्हाने अंगाची काहिली झाली आहे. यामुळे झाडाच्या सावलीखाली मेंढ्यांना एकत्र केले. याचवेळी जवळच असलेल्या विहीरीतील पाणी पिण्यासाठी बाप, लेक गेले. याच दरम्यान, परत येईपर्यंत अचानकपणे येथील मेंढ्या भुकेने व्याकुळ असल्यामुळे जवळ असणार्‍या विषारी हिवारच्या शेंगा खाल्ल्याने काही वेळातच २४ मेंढ्याचा पोट फुगून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये मेंढपाळाचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. सरकारकडून  तत्काळ मदत मिळावी, अशी अपेक्षा मेंढपाळ नाना रामदास सुळ यांनी व्यक्त केली. 
 
याबाबतची अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथील मेंढपाळ नाना रामदास सुळ हा युवक मेंढ्या चारण्यासाठी सातारा तालुक्यातील कोंडवे गावात आला आहे. त्यांचा तेथे तळ आहे. ते आपल्या मेंढ्या घेऊन जाण्यासाठी आव्हाडवाडी, निकमवाडी या गावच्या शिवारातून सोमवारी दिवसभर चरण्यासाठी गेले होते. दरम्यान, निकमवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता बापलेक एका विहीरीत पाणी पिण्यासाठी गेले. त्याचवेळी मेंढ्यांना हिवराच्या झाडाच्या शेंगा दिसल्याने मेंढ्या पळत त्या झाडाखाली गेल्या. मेंढ्यांना आडवेपर्यंत त्यांनी शेंगा खाल्ल्या, त्यामुळे मेंढ्याचा मृत्यू पोट फुगून झाला. या घटनेने मेंढपाळ नाना सुळ हतबल झाले आहेत.

पशुसंवर्धनकडून मदतीचे आश्वासन

हिवराच्या शेंगा खाल्याने २४ मेंढ्यांचा सातारा तालुक्यातील निकमवाडी येथे मृत्यू झाला. या मेंढपाळाच घरट सावरण्यासाठी घटना समजताच तत्काळ सातारा जि.प.चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार पोहोचले. त्यानंतर त्यांनी या घटनेचा पंचनामा करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. महसुल विभागाच्या माध्यमातून या मेंढपाळास मदत मिळण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर झेडपीच्या माध्यमातुनही या मेंढपाळास आपल्या उपजिवीकेसाठी पुन्हा उभारी घेता यावी, यासाठी मदत केली जाणार आहे.

- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा

 

Related Articles