पाकिस्तानी नागरिकांची तातडीने रवानगी   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पुणे : राज्यातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माध्यमात चुकीच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. एकही पाकिस्तानी नागरिक हवलेला नाही. सर्वच नागरिक सापडले आहेत. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठविण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पुण्यात 
स्पष्ट केले. 
 
पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात चुकीच्या बातम्या करु नका, माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पुणे महापालिकेला ७५ वर्षे पुण्या झाली आहेत. पुणे महापालिकेचे पहिले प्रशासक स.गो. बर्वे यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

Related Articles