तपासात पाकिस्तानला हवा आहे चीनचा सहभाग   

मॉस्को : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानला रशिया आणि चीनला सहभागी करून घ्यायचे आहे, अशी माहिती एका माध्यमाने जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
 
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जण ठार झाले, त्यात बहुतांश पर्यटक होते. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोर्‍यातील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. पाकिस्तानस्थित प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तैयबा (एलइटी) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसह त्यांच्या सूत्रधारांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, रशिया आणि चीन यांच्यासह पाश्चात्य देशही या संकटात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात. ते एक तपास पथक देखील तयार करू शकतात. ज्याद्वारे भारत किंवा मोदी खोटे बोलत आहेत, की ते खरे ते समोर येईल. आंतरराष्ट्रीय संघाला शोधू द्या. 
 
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही आंतरराष्ट्रीय चौकशीचा प्रस्ताव दिला आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. भारतातील, काश्मीरमधील या घटनेला कोण जबाबदार आहे, आणि कोण घडवून आणत आहे ते शोधा. चर्चा किंवा रिकाम्या विधानांचा काहीही परिणाम होत नाही. यात पाकिस्तानचा हात असल्याचा काही पुरावा असावा. या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा पाठिंबा होता? ही फक्त विधाने पोकळ आहेत दुसरे काही नाही, असे ख्वाजा आसिफ या मुलाखतीत म्हणाले आहे. 
 

Related Articles