देशद्रोही वक्तव्य करणार्‍या १६ जणांना अटक   

गुवाहाटी : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी आसाममध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी दिली.सरमा यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही साम्य नाही. दोन्ही देश शत्रू राष्ट्र आहेत आणि आपण असेच राहिले पाहिजे. पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार झाले. त्यानंतर देशविरोधी वक्तव्य करणार्‍या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Related Articles