पहलगामचा दहशतवादी हल्ला   

कानपूरमधील बागेला शुभम द्विवेदी यांचे नाव 

कानपूर : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांचे नाव येथील श्यामनगर चौकाला आणि बागेला देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापौर प्रमिला पांड्ये यांनी शनिवारी दिली.
 
शुभम आणि अशान्या यांचा विवाह १२ फेब्रुवारी रोजी झाला होता. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी शुभम यांची हत्या पत्नीसमोर गोळ्या घालून केली होती. यानंतर कनापूर महापालिकेने श्यामनगर चौकाला आणि तेथील बागेला शुभम द्विवेदी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. तसेच अशान्या यांना  कानपूर महापालिकेत नोकरी दिली जाणार आहे. दरम्यान, महापौरांसह भाजपचे नगरसेवक आणि कर्मचार्‍यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी महापालिका मुख्यालय ते मोतिजहेल असा मोर्चा देखील काढला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असिफ मुनीर यांचे पुतळे जाळून नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Related Articles