व्हॉट्सऍप कट्टा   

एका जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याला स्वतःच्या हुशारीबद्दल गर्व होता. तो म्हणत असे, मी सर्व प्राण्यांत हुशार आहे.
एक दिवस तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याला काही मिळाले नाही. त्याला भूक सहन झाली नाही. अखेर त्याला एक कासव दिसले. त्याला खूप आनंद झाला. त्याने उडी मारून कासवाला पकडले. कोल्ह्याने कासवाचे कवच फोडण्याचा प्रयत्न केला; पण ते काही फुटेना. कासव धूर्तपणे म्हणाले, तू मला पाण्यात का बुडवत नाहीस? म्हणजे माझे कवच मऊ होईल व मला तू सहजपणे खाऊ शकशील. भुकेने व्याकुळ झालेल्या कोल्ह्याने, काही विचार न करता कासवाला तळ्यात ढकलले. 
कासव कोल्ह्याच्या हातातून सहज निसटले व आनंदाने पाण्यात पोहू लागले. ते तळ्याच्या मध्यभागी गेले आणि म्हणाले, कोल्ह्या, स्वतःला फार हुशार समजू नकोस.
 
बोध : जसे पेराल तसेच उगवेल किवा जशास तसे.
-------
अपयश आणि संघर्ष जीवनाचा अनिवार्य भाग आहेत; पण त्या अपयशांवर मात करणे आणि उत्साह कायम ठेवणे हेच खरे यश आहे. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवते, आपली क्षमता वाढवते, आणि आपल्याला नवीन दृष्टिकोन देतं.
जेव्हा आपण वारंवार अपयशाचा सामना करतो, तेव्हा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते-जरी आपण नाकाम झालो तरी ते आपलं अंतिम ठराविक शेवट नसतं. एक खंबीर आणि समर्पित व्यक्ती अपयशांवर विजय मिळवून पुढे जाते, कारण ती त्यात नवा धडा शोधते आणि पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा घेत राहते.
म्हणजेच, ज्या वेळी आपल्याला अपयश येतं, त्या क्षणीच आपली खरी परीक्षा असते. आपल्याला उत्साह कमी न करता, नवा दृष्टिकोन घेऊन पुढे जाऊन, ठरवलेल्या उद्दिष्टाकडे चालत राहणं हेच खरे यश असतं.
-------
शिक्षक : बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस.
बंडू : कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.

Related Articles