बंगळुरुविरुद्ध कोलकाता सामना पावसाने खोळंबला   

बंगळुरु : आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात काल आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे हा सामना खोळंबला. हा सामना खोळंबल्यामुळे चाहते नाराज झाले. भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धानंतर या सामन्यापासून आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार होती. मात्र पावसामुळे पुन्हा सुरुवात झाली नाही. 
 
यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ’जर-तर’च्या समीकरणात अडकला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने १२ सामन्यानंतर ५ विजय आणि एका अनिर्णित लढतीसह आपल्या खात्यात ११ गुण जमा केले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी प्लेऑफ्ससाठी त्यांना अन्य संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. याउलट एक पराभव त्यांचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आणणारा ठरू शकतो. केकेआरच्या ताफ्यातून छाप सोडणार्‍या खेळाडूंच्या यादीत  वैभव अरोरा हा आघाडीवर आहे. जाणून घेऊयात त्याच्या कामगिरीसंदर्भातील खास स्टोरी वैभव अरोरा हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून  सर्वाधिक विकेट्स घेणारा वरुण चक्रवर्ती पाठोपाठ दुसरा गोलंदाज ठरला.  त्याने ११ सामन्यात १६ बळी घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीनं १२ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या असून हर्षित राणानं एवढ्याच सामन्यात १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्यात. वैभव अरोरासाठी यंदाचा हंगाम खास राहिला. 
 
कारण त्याला अधिकाधिक संधी मिळाली अन् त्याने त्याचं सोनंही करून दाखवलं. ५ फूट १० इंच उंची असलेला हा गडी  परफेक्ट बाउन्सरसह इन स्विंग-आउट स्विंगच्या कमालीच्या मिश्रणासह आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवण्यात यशस्वी ठरलाय.उर्वरित सामन्यात संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.वैभव अरोरा याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात ही पंजाब किंग्जच्या ताफ्यातून केली होती.२०२१ च्या हंगामात २० लाख रुपयांसह तो पंजाबच्या ताफ्यात सामील झाला. २०२२ मध्ये त्याला पंजाबच्या संघाने २ कोटींसह आपल्या संघात कायम ठेवले. पहिल्या दोन हंगामात त्याला फारच कमी संधी मिळाली. परिणामी २०२३ मध्ये त्याचा भाव घसरला. 
 
केकेआरने ६० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. गत हंगामात याच किंमतीसह तो केकेआरकडून खेळला. यंदाच्या हंगामात केकेआरनं त्याच्यासाठी १ कोटी ८० लाख एवढी किंमत मोजली होती. आतापर्यंत ३१ सामन्यात त्याच्या खात्यात ३५ विकेट्स जमा आहेत. त्यातील १६ विकेट्स या यंदाच्या हंगामात त्याने घेतल्या आहेत. केकेआरचा संघ स्पर्धेत टिकणं अवघड असले तरी वैभव अरोरानं एक प्राइम बॉलरच्या रुपात आपली संघातील जागा फिक्स केली एवढ मात्र नक्की.

Related Articles