E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
हैदराबादचा चेन्नईविरुद्ध 5 फलंदाज राखून विजय
Vikrant kulkarni
26 Apr 2025
चेन्नई
: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 हंगामात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या चेन्नईविरुद्ध हैदराबाद या 43 व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. चेन्नईच्या संघाला 154 धावांवर रोखले. याचबरोबर हैदराबादच्या संघाने 5 फलंदाज राखुन विजय मिळविला. हैदराबादच्या गोलंदाजांपैकी हर्षल पटेल याने महत्त्वपुर्ण 4 बळी घेतल्या. त्यामुळे
त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर महमद शमी, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आणि कामिंदू मेंडीस यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
या सामन्याआधी हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाने 19.5 षटकांत 154 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला 155 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबदच्या संघाकडून सलामीवीर हेड याने 19 धावा केल्या. त्याला अनशुल कंबोज याने त्रिफळाबाद केले. तर सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. इशान किशन हा 44 धावा करून नूर अहमद याच्या गोलंदाजीवर सॅम करन याच्याकडे झेलबाद झाला. क्लासेन याने 7 धावा केल्या. रवींद्र जडेजा याने शानदार गोलंदाजी करत दीपक हुडा याच्याकडे त्याला झेलबाद केले. त्यानंतर मधल्या फळीतील अनिकेत वर्मा हा 19 धावांवर बाद झाला. नूर अहमद याने शानदार गोलंदाजी करत दीपक हुडा याच्याकडे त्याला झेलबाद केले. कामिंदू मेंडीस याने नाबाद 32 धावा करत हैदराबादला सामना जिंकून दिला. नितीशकुमार रेड्डी याने त्याला साथ देताना नाबाद 19 धावा केल्या. 15 अवांतर धावा हैदराबादच्या संघाला मिळाल्या.
त्याआधी चेन्नईच्या संघाकडून फलंदाजी करताना रशीद हा शून्यावर बाद झाला. त्यावेळी चेन्नई संघाची एकही धाव झाली नव्हती. आयुष म्हात्रे याने 30 धावा केल्या. कमिन्स याने शानदार गोलंदाजी करत इशान किशन याच्याकडे त्याला झेलबाद केले. सॅम करन याने 9 धावा केल्या. हर्षल पटेल याने त्याला अनिकेत वर्माकडे झेलबाद केले. रवींद्र जडेजा याने 21 धावा केल्या. कामिंदू मेंडीस याने त्याचा त्रिफळा उडविला. डेवाल्ड ब्रेविस हा 42 धावांवर बाद झाला शिवम दुबे 12 धावांवर असताना जयदेव उनाडकट याने त्याला अभिषेक शर्माकडे झेलबाद केले. धोनी हा अवघ्या 6 धावांवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माकडे झेलबाद झाला. अनशुल कंबोज हा 2 धावांवर तर नूर अहमद 2 धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : अभिषेक शर्मा 0, हेड 19, इशान किशन 44, क्लासेन 7, अनिकेत वर्मा 19, कामिंदू मेंडीस नाबाद 32, नितीशकुमार रेड्डी नाबाद 19, अवांतर 15 एकूण 18.4 षटकांत 155/5
चेन्नई : रशीद 0, आयुष म्हात्रे 30, सॅम करन 9, धोनी 6, रवींद्र जडेजा 21, डेल्वाड ब्रेविस 42, शिवम दुबे 12, दीपक हुडा 22, अनशुल कंबोज 2, नूर अहमद 2, खलील अहमद 1 एकूण 19.5 षटकांत 154/10
Related
Articles
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
पाकिस्तानी सैन्याची दहशतवाद्यांना साथ
13 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
पाकिस्तानी सैन्याची दहशतवाद्यांना साथ
13 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
पाकिस्तानी सैन्याची दहशतवाद्यांना साथ
13 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
पाकिस्तानी सैन्याची दहशतवाद्यांना साथ
13 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
जातींची नोंद काय साधणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली