सोलापुरातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या शहर अंतर्गत बदल्यांचे आदेश !   

सोलापूर : पोलीस आयुक्तालयातील फौजदार ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक ६, सहायक पोलीस निरीक्षक ९, फौजदार ९ यांचा समावेश आहे.
 
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील सुहास चव्हाण यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शहर वाहतूक शाखेतील सूरज मुलाणी व्यांची नियुक्ती करण्यात आली. सुरक्षा शाखेतील शिवाजी राऊत त्यांची बदली जेलरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली तर जेलरोडचे सुरेश चाटे यांची बदली शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागात करण्यात आली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यातील संगीता पाटील यांची बदली सुरक्षा शाखा व विमानतळ सुरक्षा विभागाकडे झाली आहे. तर नव्याने रुजू झालेले सुशांत वराळे यांच्याकडे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचा पदभार देण्यात आला आहे.
 
शहर गुन्हे शाखेतील संदीप पाटील यांची बदली जेलरोड पोलीस ठाण्यात, गुन्हे शाखेतील संजय क्षीरसागर यांची बदली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात, शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील अनिल राजगुरू यांची बदली सदर बझार पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील रमेश कांबळे यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील राचप्पा चानकोटी यांची अर्ज शाखेत बदली करण्यात आली आहे.
 
विजापूर नाका पोलीस ठाण्यातील अजय पोपळभट यांची बदली शहर वाहतूक दक्षिण शाखेत, नियंत्रण कक्षातील नागनाथ कानडे यांची बदली झाली, शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील प्रवीण पारडे यांची बदली सदर बझार पोलीस ठाण्यात, आर्थिक गुन्हे शाखेतील मोहन पवार यांची बदली विजापूर नाका पोलीस ठाण्यात, विशेष शाखेतील प्रकाश किणगी यांना, फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील राधा जेऊघाले यांना, जलद प्रतिसाद पथकातील प्रकाश बनसोडे यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली.
 
शहर वाहतूक शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांची बदली सदर बाजार पोलीस ठाण्यात, अर्ज शाखेतील हिना कौसर कलाल यांची बदली शहर वाहतूक उत्तर विभागात, सदर बझार पोलीस ठाण्यातील फौजदार अतुल बनकर यांची बदली शहर वाहतूक दक्षिण विभागात व सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील यांची एमआयडीसी येथे विमानतळ सुरक्षा विभागात बदली झाली आहे. 
 
सोलापूर महानगरपालिका उपायुक्त किरण मोरे यांची पिंपरी-चिंचवडला बदली
 
सोलापूर :  सोलापूर महापालिकेतील उपायुक्त किरणकुमार मोरे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त गट- अ पदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी तसे आदेश काढले आहेत.सोलापूर किरणकुमार महापालिकेत मोरे यांची उपायुक्तपदी एक महिन्यापूर्वी नियुक्ती झाली होती. त्यांच्याकडे महापालिकेतील विविध विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडून मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आस्थापनेवरील पदावर महापालिकेकडील अधिकारी पदोन्नतीने उपलब्ध होईपर्यंत प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण सतरा अधिकाऱ्यांच्या या आदेशांतर्गत विनंतीवरून प्रतिनियुक्ती करण्यात आल्या आहेत. यामध्येच उपायुक्त किरणकुमार मोरे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे.दरम्यान, उपायुक्त किरणकुमार मोरे यांच्या जागी सोलापूर महापालिकेत या रिक्त पदावर कोण येणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Related Articles