जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना   

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये चारजणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासनाला दिले आहेत.  
 
कुंडमळामध्ये दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. बचावकार्याला वेग देण्याचे व एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच, शोक व्यक्त करताना पर्यटनस्थळी विशेषत: सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीची यंत्रणा तत्पर ठेवावीत, अशा सुचनाही शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

Related Articles