हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न   

पुणे : डीपी रस्त्यावर असलेल्या एका कॅफेबाहेर मंगळवारी रात्री उशिरा तीन जणांनी कोयता आणि पालघनसारखी धारदार शस्त्रे हवेत नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. 
 
दरम्यान, या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरदेखील संबंधित पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार देण्यासाठी आले नाही. तसेच, पोलिसांनीदेखील गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, सीसीटिव्ही कॅमेर्‍यांमध्ये या प्रकाराचे चित्रीकरण झाले आहे. शहरात मागील अनेक दिवसांपासून किरकोळ कारणांवरून होणारी मारहाण, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असे अनेक प्रकार समोर येत आहेत. 

Related Articles