भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार   

अमेरिकेचे प्रतिनिधी पुढील महिन्यात येणार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तात्पुरता व्यापार करार होणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी मंडळ २५ जून रोजी चर्चेसाठी भारतात येणार आहे. त्यावेळी तो करार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
भारताच्या वाणिज्य विभागाचे विशेष सचिव आणि मुख्य वाटाघाटी करणारे राजेश अगरवाल यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा पूर्ण केला. वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत प्रस्तावित व्यापार करारावर चचार्ं देखील केली होती. तेव्हा दोन्ही देशांनी तात्पुरत्या द्विपक्षीय व्यापार करार प्रस्तावावर चर्चा देखील केली होती. अमेरिकेने भारतावर २ एप्रिल रोजी २६ टक्के प्रत्त्युत्तर करलागू करण्याची घोषणा केली होती. नंतर ९ जुलैपर्यंत  त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. सध्या भारतातून आयात होणार्‍या वस्तूंवर अमेरिका दहा टक्के आकारत आहे. तात्पुरता व्यापार करार झाला तर २६ टक्के प्रत्त्युत्तर कर रद्द होईल. दोन्ही देशांनी प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात या वर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर महिना ठरविला आहे.  दरम्यान, अमेरिका   २०२४ ते २०२५ मध्ये भारताचा सर्वात मोठी चौथा भागीदार देश ठरला आहे. व्यापार सुमारे १३१.८४ अब्ज डॉलर्स एवढा आहे.भारताच्या एकूण वस्तू निर्यातीपैकी अमेरिकेचा वाटा सुमारे १८ टक्के, आयातीत ६.२२ टक्के आणि देशाच्या एकूण वस्तू व्यापारात १०.७३ टक्के आहे.
 

Related Articles