E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यात मान्सून स्थिरावला
Samruddhi Dhayagude
28 May 2025
पुढील दोन दिवसांत आणखी भाग व्यापण्याची शक्यता
पुणे : राज्यात मान्सून स्थिरावला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भाग व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील ४८ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा येथील घाट विभाग चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य अरबी समुद्राच्या उर्वरीत भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर बंगालचा उपसागरचा आणखी काही भाग, उत्तर पूर्व प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकचा उर्वरीत भाग, छत्तीसगड, ओडीशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत, पश्चिम मध्य भागाच्या बहुतांश भागात व्यापेल.
सध्या कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम व लगतच्या मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरावर तयार झाले आहे. एक चक्रीय चक्रवाद दक्षिण छत्तीसगड व लगतच्या पूर्व विदर्भावर स्थित, तर आणखीन एक चक्रवाद उत्तर कोकण व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शहरात दिवसभर रिपरिप
शहरासह उपनगरात सकाळपासून सुरू असल्या रिपरिप पावसाने पुणेकरांची धांदल उडवली. वडगांवशेरी येथे सर्वाधिक ३५ मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. तर दुपारी दोनच्या सुमारास आलेल्या जोरदार सरींनी रस्त्यावर पाणी साचले. शहरासह जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. सुरुवातीचे आठ ते दहा दिवस अवकाळी व पूर्वमोसमी पाऊस आणि मागील २४ तासात मान्सूनचा पाऊस पुणेकरांना चांगलाच भिजवत आहे. मे २६ रोजी मान्सून पुण्यात आला आणि पावसाची रिपरिप सुरू झाली. अधून-मधून एक ते दोन जोरदार सरी येत असल्याने पुणेकरांची धांदल उडाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. तर घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने शहर परिसरात यलो तर घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत झालेला पाऊस
माळीण ४०, वडगांवशेरी ३५, तळेगांव ढमढरे, चिंचवड ३०, एनडीए २६, मगरपट्टा आणि पाषाण २०, हवेली आणि हडपसर १८, शिवाजीनगर १६, गिरीवन १४, राजगुरूनगर १२, दौंड १०, कोरेगांव पार्क ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील २४ तासांसाठी अंदाज
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा (घाट परिसर), चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि भंडारा जिल्हे (मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस)
यलो अलर्ट : वरील जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Related
Articles
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंडच्या सीमेवर जल्लोषात स्वागत
24 Jun 2025
अर्थ काय समजायचा तो समजा : शरद पवार
21 Jun 2025
रेल्वे दुचाकी पार्सल विभागाकडून प्रवाशांची लुटमार
22 Jun 2025
आधारभूत किंमतीवर गव्हाची विक्रमी खरेदी
26 Jun 2025
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू : सपकाळ
26 Jun 2025
मोसादने इराणमध्ये तैनात केलेली ‘ब्लॅक विडो’ कोण?

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या युद्धामुळे चिंता
2
बोईंगचेच जास्त अपघात का?
3
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
4
चिराग यांचे दबावाचे राजकारण?
5
नव्या युद्धाचे संकट
6
पाच वाहनांचा विचित्र अपघात