संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंडच्या सीमेवर जल्लोषात स्वागत   

यवत,(वार्ताहर) : हवेली नंतर दौंडमध्ये प्रवेश करणार्‍या संत तुकाराम पालखी सोहळ्याचे दौंडच्या सीमेवर बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उत्साह, भक्ती आणि जल्लोषात स्वागत केले. 
 
यावेळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यवतचे पोलीस निरीक्षक प्रभाकर देशमुख, दौंड तालुका भाजपा अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, नितिन दोरगे, ज्योती झुरंगे, शामल पवार, सुशांत दरेकर, राजेंद्र तावरे, संदीप ताम्हाणे, गणेश जगदाळे, संजय ईनामके, अमोल म्हेत्रे, मुरलीधर भोसेकर, सुरेश दरेकर, प्रताप तावरे, सदानंद बालगुडे, नंदु म्हस्के, किसन म्हस्के, बाळासाहेब टेकवडे , बाळासाहेब म्हस्के, मंगेश भोसेकर, संदीप गायकवाड उपस्थित होते. पालखी सोहळा दौंडच्या सीमेवर बोरीभडक येथे आगमन झाले. याठिकाणी स्वागत स्वीकारून व पाच मिनिटे याठिकाणी प्रथमच दर्शनासाठी थांबून पालखी पुढील मुक्कामी यवतकडे मार्गस्थ झाली. यादरम्यान कांचन कुल, आदित्य कुल यवतपर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी झाले. बोरीभडक येथे स्वागतासाठी माजी सरपंच दशरथ कोळपे, कविता कोळपे, कैलास आतकिरे, विकास आतकिरे, उपसरपंच प्रवीण खेडेकर, योगेश काळे, चेअरमन आकाश गव्हाणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
 

Related Articles