रेल्वे दुचाकी पार्सल विभागाकडून प्रवाशांची लुटमार   

बंडगार्डन : पुणे रेल्वे स्थानकावर दुचाकी पार्सल विभागाकडून ग्राहक आणि प्रवाशांची फसवणुक होत आहे. या वरोधात रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून रेल्वे प्रशासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अलोक भिंगारदिवे यांनी हा प्रकार उघडी आणला आहे. अनेक जण सरकारी नोकरीत काम करणार्‍यांची बदली झाल्याने रेल्वेतून दुसर्‍या शहरात दुचाकी वाहने पाठवितात. 
 
मात्र, रेल्वे दुचाकी विभागात रेल्वे अधिकार्‍यांच्या सहमंतीने कर्मचारी नागरिकांची लुटमार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे विभागाच्या माध्यमातून खाजगी ठेकेदार नेमण्यात आले आहे. परंतू ठेकेदारची लोक अधिक पैसे घेऊन ग्राहक आणि प्रवशांची लुटमार करत आहेत. या ठेकेदाराला अधिकार्‍यांचा पाठिंबा असल्याने असे प्रकार पुणे जंक्शन विभागात होत आहे. याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा रेल्वे रोको आंदोलन राज्यातील पदाधिकारी करतील, अशा ही इशारा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याकडून करण्यात आला आहे. या आंदोलनास सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.  यावेळी आजाद समाज पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष भिमराव कांबळे व छप्परबंद क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफीकभाई शेख, आकाश दंडगुळे, किशोर वाघमारे, आकाश घोडके, रमेश धनगर, प्रकाश म्हेत्रे, संजय चौधरी, उपस्थित होते.

Related Articles