E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बनावट कागदपत्राद्वारे विवाह
Wrutuja pandharpure
25 May 2025
बांगलादेशी महिलेसह पतीला अटक
पुणे
: बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून बांगलादेशी महिलेने एका भारतीय व्यक्तीसोबत आळंदी येथे विवाह केला. मात्र, पासपोर्ट पडताळणीसाठी बांगलादेशात गेल्यानंतर ढाका विमानतळावर कागदपत्रांच्या केलेल्या छाननीत या महिलेचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदार कार्ड बनावट असल्याचेे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून या बांगलादेशी महिलेसह तिच्या भारतीय पतीला अटक केली.
सुमी हालीम खान ऊर्फ सुमी रवींद्र रॉय ऊर्फ सुमी रणजित चव्हाण (वय २९), रणजित इंद्रजित चव्हाण (वय३९, दोघे रा. नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक विशाल दयानंद बोर्डे यांनी याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.आरोपी सुमी खान ही मुळची बांगलादेशातील असून, ती २०१६ मध्ये घुसखोरी करुन भारतात आली होती. तीने १३ जून २०२४ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यातून पासपोर्ट व्हेरिफिकेशन करुन घेतले होते. पासपोर्ट विभागाने विशेष शाखेमध्ये पत्र पाठवून तिच्या विषयी माहिती दिली होती. सुमी हिच्याकडे ढाका (बांगलादेश) विमानतळावर चौकशी दरम्यान आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी खोटी कागदपत्रे मिळून आली आहेत.
तिच्याकडे अधिकृत बांगलादेशी कागदपत्रे आणि ओळखपत्रे सापडली असून, तिने खोट्या कागदपत्रावरुन पासपोर्ट प्राप्त केल्याचे समोर आले आहे. तसेच, तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे पासपोर्ट विभागाने पोलिसांना कळविले. त्यानुसार सिंहगड रोड पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यात तिने २०१६ मध्ये भारतात प्रवेश केला. हडपसर येथील हॉटेलमध्ये कॉलगर्लचा व्यवसाय करत होती. त्यावेळी रणजित इंद्रजित चव्हाण याच्याबरोबर ओळख झाली. त्यांनी ८ ऑक्टोंबर २०२० रोजी त्याच्या बरोबर आळंदी येथे रजिस्टर पद्धतीने लग्न केले. तिच्या कडील आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला, मतदान कार्ड ही कागदपत्रे तिचे पती रणजित चव्हाण याच्या ओळखीने एका एजंटाने तिला काढून दिले आहेत. ही कागदपत्रे बनावट आहेत. तसेच ती बांगलादेशी आहे, ही बाब रणजित चव्हाण याला माहिती होती.
सुमी हिच्या जन्म दाखल्यावर सुमी रवींद्र रॉय जन्म ८ जानेवारी १९९४ स्थळ, सिव्हिल हॉस्पिटल संयोगितागंज, इंदूर, असे असून आई वडिलांचा पत्ता शांतीनाथ पुरी, इंदूर असे दाखविले आहे. तो जन्मदाखला २१ जून २०२३ रोजी दिला असल्याचे त्यावर नमूद केल्याचे सिंहगड पोलिसांनी केलेल्या तपासणीत आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले; पाच ठार
06 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चुकीचे शस्त्र परवाने होणार रद्द
07 Jun 2025
पुण्यात दुसर्या दिवशीही जोरदार पाऊस
08 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले; पाच ठार
06 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चुकीचे शस्त्र परवाने होणार रद्द
07 Jun 2025
पुण्यात दुसर्या दिवशीही जोरदार पाऊस
08 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले; पाच ठार
06 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चुकीचे शस्त्र परवाने होणार रद्द
07 Jun 2025
पुण्यात दुसर्या दिवशीही जोरदार पाऊस
08 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले; पाच ठार
06 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चुकीचे शस्त्र परवाने होणार रद्द
07 Jun 2025
पुण्यात दुसर्या दिवशीही जोरदार पाऊस
08 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका