E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात दुसर्या दिवशीही जोरदार पाऊस
Samruddhi Dhayagude
08 Jun 2025
पुणे
: पुण्यात सलग दुसर्या दिवशी कमी वेळात जास्त पाऊस पडला. त्यामुळे शहरासह उपनगरातील बहुतांश रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाऊस आणि वाहत्या पाण्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. त्यामुळे मध्यवर्ती भागांसह शहरात वाहतूक कोंडी झाली. विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची पावसामुळे गैरसोय झाली, तर वाहतूक कोंडीमुळे निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब झाला.
सकाळपासूनच आकाशात ढग भरून आले होते. त्यानंतर सुमारे ९.३० च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली. जोरदार पावसामुळे दुचाकी चालकांना वाहन रस्त्याच्या कडेला लावून आश्रयाला थांबावे लागले. तर मोठ्या वाहनांना खड्ड्यांचा अंदाज घेत पुढे जावे लागले. पादचार्यांची मात्र या पावसामुळे गैरसोय झाली. त्यांना पाऊस थांबेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या पावसामुळे कार्यालयात तसेच कामाच्या ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला. पावसामुळे नियोजित कामे रद्द करून घरातच थांबणे पसंत केले. तुळशीबाग, सराफी बाजार, बोहरी आळी, महात्मा फुले मंडई, डेक्कन परिसर आणि मार्केटयार्डातील बाजारावर पावसाचा परिणाम झाला.
जोरदार पावसात वाहन चालविणे अशक्य होत असल्याने बऱ्याच जणांनी वाहने रस्त्याच्या कडेला लावून पाऊस थांबण्याची वाट पाहिली. त्यामुळे सुमारे तासभर पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील वाहनांसह, नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. रस्त्यांवरून वाहणार्या पाण्यामुळे वाहन चालक व नागरिकांना पाण्याचा अंदाज घेत चालणे कठीण होत असल्यामुळे नागरिकांनी आहे त्या ठिकाणीच थांबणे पसंद केले.साधारण तासाभरानंतर पाऊस थांबला त्यानंतर मात्र मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसले.
पूर्व दक्षिण पुण्यावर पावसाचे ढग
सकाळपासूनच पूर्व दक्षिण पुणे पावसाळी काळ्या ढगांनी व्यापले होते. त्यामुळे काल सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही. सुमारे नऊ वाजता या भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. तसेच पुणे विद्यापीठ, पाषाण, सुस, बाणेर, आयसर परिसरात ढगाळ वातावरणासह जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागातील व्यवहारही काही काळ विस्कळीत झाले होते.
राज्यात मान्सून स्थिर
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम आहे. पूर्व विदर्भ ते उत्तर कर्नाटकापर्यंत द्रोणीय रेषा स्थिर आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. अकोला, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम येथे वादळी वार्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
https://youtube.com/shorts/caZGtyRNYuo?feature=share
Related
Articles
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !