E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानला कर्ज देण्याचे नाणेनिधीकडून समर्थन
Samruddhi Dhayagude
24 May 2025
वॉशिंग्टन : पाकिस्तानला मंजूर करण्यात आलेल्या एक अब्ज डॉलर्स कर्जाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) समर्थन केले आहे. पाकिस्तानने सर्व अटी आणि उद्दिष्टे पूर्ण केल्यामुळेच हा निधी मंजूर करण्यात आला, असे आयएमएफने म्हटले आहे.भारत आणि पाकिस्तानात लष्करी संघर्ष सुरू असतानाच आयएमएफने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले होते. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १६ मे रोजी आयएमएफला आर्थिक मदतीचा फेरविचार करण्यास सांगितले होते.
दरम्यान, आयएमएफच्या संपर्क विभागाच्या संचालक ज्युली कोझॅक यांनी पाकिस्तानला दिलेल्या निधीचे समर्थन केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला देण्यात आलेल्या विस्तारित निधी सुविधेचा (ईएफएफ) आढावा घेतल्यानंतर कार्यकारी मंडळाने ९ मे रोजी ही रक्कम मंजूर केली, असे कोझॅक यांनी सांगितले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर‘ अंतर्गत पाकिस्तावर कारवाई केली. त्यानंतरही, पाकिस्तानची खुमखुमी कायम होती. मात्र, भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले.
यादरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (आयएमएफ) वॉशिंग्टनमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानच्या निधीबाबत चर्चा झाली. त्यावेळी भारताने यासंदर्भातील प्रस्तावास तीव्र आक्षेप घेतला होता. या निधीचा वापर पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत आला असल्याचे सांगत मतदानावेळी भारत गैरहजर राहिला होता.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच आयएमएफने पाकिस्तानवर ११ नव्या अटी घातल्या होत्या. भारताबरोबरील तणाव या कर्जयोजनेतील आर्थिक, बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्टे धोक्यात आणू शकतात, असा इशारादेखील नाणेनिधीने दिला होता. नाणेनिधीने पाकिस्तानवर घातलेल्या अटींची संख्या यामुळे ५० वर पोहोचली आहे.
Related
Articles
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
29 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 May 2025
आरोग्य यंत्रणांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार