E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अँजेलो मॅथ्यूज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
Samruddhi Dhayagude
24 May 2025
कोलंबो : आता आणखी एका दिग्गज खेळाडूने कसोटी फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज. जून महिन्यात बांगलादेश संघाच्या श्रीलंका दौर्यादरम्यान खेळल्या जाणार्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळल्यानंतर ३७ वर्षीय मॅथ्यूज या फॉरमॅटला अलविदा म्हटले. भावनिक पोस्ट शेअर करत अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबद्दल अँजेलो मॅथ्यूजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना हा या फॉरमॅटमधील त्याचा शेवटचा सामना असेल. मी या फॉरमॅटला अलविदा करत असलो तरी, निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर संघाला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल, तेव्हा मी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेन.मला वाटते की सध्या आमच्या कसोटी संघात अनुभवी आणि युवा खेळाडू आहेत. माझ्यासाठी हा माझा आवडता क्रिकेट फॉरमॅट आहे, पण आता त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेल्या १७ वर्षांपासून श्रीलंकेसाठी या फॉरमॅटमध्ये खेळणे माझ्यासाठी सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे.
अँजेलो मॅथ्यूजच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ११८ सामन्यांमध्ये ४४.६२ च्या सरासरीने ८१६७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १६ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. १७ जूनपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणार्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मॅथ्यूज शेवटच्या वेळी पांढर्या रंगाची जर्सी घालणार आहे आणि त्याच्याकडे विराट कोहलीला मागे टाकून घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी असेल, ज्यापासून तो फक्त १३ धावा दूर आहे. दोन कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, बांगलादेश संघाला श्रीलंकेत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तेवढ्याच टी-२० सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
Related
Articles
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार