E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बलुचिस्तानमध्ये शाळेच्या बसवर आत्मघातकी हल्ला
Samruddhi Dhayagude
22 May 2025
तीन मुलांसह पाच ठार; ३८ जखमी
इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी एका शाळेच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन मुलांसह पाच जण ठार झाले. तर, अनेक जण जखमी झाले आहेत, असे लष्करी अधिकार्यांनी सांगितले.खुजदार जिल्ह्यात शालेय मुलांना घेऊन जाणार्या बसला लक्ष्य करण्यात आले. या भ्याड आणि भयानक हल्ल्यात तीन मुलांसह पाच जण ठार झाले. तर, अनेक मुले जखमी झाले आहेत, असे लष्कराने निवदेनात म्हटले आहे. गृहमंत्रालयानेदेखील आत्मघातकी स्फोटास दुजोरा दिला आहे.
या स्फोटात ३८ जण जखमी झाले आहेत, असे खुजदारचे उपायुक्त यासिर इक्बाल दश्ती यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले जात आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
प्राथमिक निष्कर्षांवरून हा हल्ला आत्मघातकी स्फोट असल्याचे दिसून आले आहे. जखमींना प्रारंभी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी क्वेटा आणि कराची येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, निष्पाप मुलांच्या आणि शिक्षकांच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हे कृत्य करणार्यांना लवकरच पकडले जाईल तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. निष्पाप मुलांना लक्ष्य करणार्यांवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असेही ते म्हणाले. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान हा प्रांत नेहमीच अशांत राहिला. बलुच बंडखोरांनी यापूर्वी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांना लक्ष्य केले होते.
Related
Articles
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला