मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र   

नवी दिल्ली : मतदार यादीतील तपशील अद्ययावत केल्यानंतर १५ दिवसांच्या आत मतदार ओळखपत्रे प्रदान करण्यासाठी एक नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना १५ दिवसांत ओळखपत्र मिळेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 
 
सध्या मतदारांना मतदार ओळखपत्रे वितरित करण्यासाठी एका महिन्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे. नवीन प्रणाली निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांद्वारे  कार्ड तयार करण्यापासून ते पोस्ट विभागाद्वारे मतदारांना कार्ड पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे रिअल-टाइम ट्रॅकिंग सुनिश्चित करेल. मतदारांना प्रत्येक टप्प्यावर एसएमएसद्वारे सूचना देखील मिळतील, ज्याद्वारे मतदारांना त्यांच्या कार्डच्या स्थितीबद्दल माहिती मिळत राहील.

Related Articles