इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले   

तेहरान : इराण आणि इस्रायल संघर्ष सलग तिसर्‍या दिवशी सुरू होता. एकमेकांवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्ल्याला इस्रायलने रविवारी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. त्या अंतर्गत इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केले. घातक क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. आपण केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.
 
इराणने समृद्ध युरेनियमचा साठा करुन अणुबा्रँब निर्मितीचा घाट घातला आहे. मात्र, त्याला इस्रायलचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी त्याने इराणच्या विविध अणु प्रकल्पांना लक्ष्य केले. तसेच लष्करी ठाणी हवाई हल्ले करुन उद् ध्वस्त केली आहेत. त्याला हल्ल्याला इराणने शेकडो क्षेपणास्त्रे डागून उत्तर दिले. यानंतर एकमेकाचा वचपा काढल्यानंतर दोन्ही देश शांत होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, इस्रायलच्या ताज्या हल्ल्यानंतर ती फोल ठरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तेहरान येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात अणु कार्यक्रम राबविला जात असल्याचा आरोप इस्रायलने केला असून त्यासाठी तेथे हल्ले चढविले असल्याचे म्हटले आहे. इराणच्या निमलष्करी दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की,  क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या गॅसनिर्मिती केंंद्राला लक्ष्य केले. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कार्टज म्हणाले, तेहरान आता पेटत आहे.
 

Related Articles