E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी देहूत आढावा बैठक
Wrutuja pandharpure
21 May 2025
पिंपरी
: जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १८ जून रोजी पंढरपूरकडे होणार आहे. त्या अनुषंगाने पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीबाबत देहू नगरपंचायत व देहू देवस्थान संस्थानची संयुक्त आढावा बैठक देहू नगरपंचायतीच्या सभागृहात झाली.
देहू नगरपंचायतीच्या अध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीस देहू नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश परंडवाल, नगरसेविका पूनम काळोखे, स्मिता चव्हाण, देहू देवस्थान संस्थानचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे उपस्थित होते. बैठकीत पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त येणात्या दिंड्या, वारकरी यांना कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी देहू नगरपंचायतीने विविध कामांची तयारी केली आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेबसविण्यात येणार असून, अनेक ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात येणार आहेत.
पाण्याचे टँकर्स नळतोट्यांसहित उपलब्ध करून देणे, नदीपात्रात पाणीपुरवठा करण्याबाबत पाट बंधारे विभागाशी पत्रव्यवहार करणे, देहूतील सर्व आरओ पाणी धारकांची पाणीतपासणी करून घेण्याबाबत या विभागाकडून पत्रव्यहार करण्यात आला आहे. देहू प्राथमिक केंद्रासदेखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नदीघाटावरील सर्व हायमस्क दुरुस्त करून सुरू करणे, मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर व परिसर मुख्य कमान, देह शहरातील सर्व रस्ते व विविध दिंड्यांच्या ठिकाणी वीजपुरवठा व्यवस्थित होईल याची दक्षता घेणे, एमएसईबीचे उघडयावरील डीपी व तारा संबंधित पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
मंदिर परिसराची साफसफाई , इंद्रायणी नदीमधील जलपर्णी काढणे ही कामे प्रगतिपथावर आहेत. दोन दिवसांसाठी जीवरक्षक ठेवणे, नगरपालिकेकडून अग्निशमन बंब देण्याबाबत मागणीपत्र , वैकुंठगमन मंदिर परिसराची साफसफाई , घूरफवारणी करणे, मुख्य कमान ते काळोखे चौक, मुख्य कमान ते रामकृष्ण मंगल कार्यालयपर्यंत साफसफाई, फिरत्या शौचालयांची व्यवस्था करणे, तसेच या काळात मांस-मच्छी विक्री बंद ठेवणे अशी कामे आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहेत. देहू नगरपंचायत हद्दीत आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स लावणे, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसविणे, पोलीस खात्याशी संपर्क करून आवश्यक ती कामे करून घेणे, पीएमपीएल व एसटी आगार व्यवस्थापक यांना पत्र देणे ही कामे बांधकाम विभाग करणार आहे.
अतिक्रमण विभागामार्फत अनगडशहा बाबा दर्गा ते देहू गाव मुख्य कमान देहू गाव चौदा टाळकरी कमान ते भक्ती शक्ती निवास यादरम्यान असलेल्या सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविणे आणि अतिक्रमण न काढल्यास फुटपाचसह अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषदेकडून एक हजार फिरती शौचालये देण्यात येणार असून, श्री विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी, सिद्धेश्वर मंदिर, गाथा मंदिर, चव्हाणनगर रोड मैदान, भैरवनाथ चौक, मुख्य घाट आणि मुख्य कमानीदरम्यान आदी ठिकाणी ही शौचालये उभी करण्यात येणार आहेत.
Related
Articles
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही
30 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही
30 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही
30 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही
30 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
6
सोलापूरात विमानसेवा सुरू