E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बंगळुरूला पावसाचा तडाखा; तिघांचा मृत्यू, ५०० घरे पाण्याखाली
Samruddhi Dhayagude
20 May 2025
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये दोन दिवस पावसाने थैमान सुरू आहे. रविवारी संध्याकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत या १२ तासांत बंगळुरूमध्ये सुमारे १३० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५०० घरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील टोनी भागातील अनेक रस्त्यांचे जलमार्गात रूपांतर झाले आहे. तसेच शहरातीलभूंयरी मार्ग आणि उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. बेंगळुरूच्या बऱ्याच भागात सार्वजनिक बस सेवाही पावसामुळे ठप्प झाल्या आहेत.
कमी दाबाच्या दोन पट्ट्यांच्या एकत्रीकरणामुळे शहराच्या दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागात वादळासह मुसळधार पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवार ते सोमवारमध्ये १२ तास पडलेला पाऊस दशकातील दुसरा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती बंगळुरू महापालिकेचे मुख्य आयुक्त महेश्वर राव यांनी दिली आहे.
दक्षिण बेंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील मधुवना अपार्टमेंटमध्ये सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता साचलेले पावसाचे पाणी बाहेर काढताना मनमोहन कामथ (६३) आणि सुरक्षा रक्षकाचा मुलगा दिनेश (१२) हे दोघेही विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडले. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या कामथ यांनी पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार आणली. त्याच वेळी, सुरक्षा रक्षक भरत यांचा मुलगा दिनेश कामथ यांच्या मदतीसाठी आला होता. त्यावेळी मोटार चालू करताच दोघांनाही विजेचा धक्का बसला. यानंतर इतर रहिवाशांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश तीन महिन्यांपूर्वी त्याच्या पालकांसह नेपाळहून बंगळुरूला आला होता.
दुसरीकडे व्हाइटफील्डमधील हाऊसकीपिंग कर्मचारी शशिकला डी (३२), यांचा त्यांच्या कार्यालयातील इमारतीची भिंत कोसळून मृत्यू झाला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
Related
Articles
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका