E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयचा नवा नियम
Wrutuja pandharpure
17 May 2025
मुंबई
: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा खोळंबली होती. दोन्ही देशांच्या संमतीने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर आयपीएलमधील उर्वरित सामने पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द करण्यात आलेल्या सामन्यासह उर्वरित १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रकासह बीसीसीआयने स्पर्धेत नवा नियमही लागू केला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यावर अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले असून त्यातील काही खेळाडू पुन्हा आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिस्थितीत आयपीएल फ्रँचायझी संघाचे टेन्शन कमी करण्यासाठी बीसीसीआयने बदली खेळाडूसंदर्भातील नियम नव्या तरतुदीसह लागू केला. त्याचा फ्रँचायझी आणि संघाला फायदा होईल.
आयपीएल नियमानुसार, दुखापतग्रस्त असणार्या किंवा आजारी असलेल्या खेळाडूच्या रुपात बदली खेळाडूचा संघात समावेश करण्याचा नियम आधीपासूनच लागू आहे. पण हा नियम स्पर्धेतील पहिल्या १२ सामन्यांसाठी होता. त्यानंतरच्या सामन्यात हा नियम लागू नव्हता. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यावर पुन्हा उर्वरित सामने खेळवताना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी बीसीसीआयने फ्रँचायझी संघांना तात्पुरत्या स्वरुपात बदली खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बदली खेळाडू संदर्भातील नियमानुसार, फ्रँचायझी संघांना बदली खेळाडूच्या रुपात फक्त अशा खेळाडूला घेता येईल, ज्याने आयपीएलमध्ये नाव नोंदणी केली होती. याचा अर्थ अनसोल्ड राहिल्या खेळाडूला या नियमानुसार वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते. ज्या खेळाडूच्या जागी तो संघात येणार आहे, त्या खेळाडूपेक्षा अधिक प्राइज टॅग असणार्या गड्याचा संघात समावेश करता येऊ शकत नाही. एवढेच नाही तर बदली खेळाडूच्या रुपात संघात आलेल्या खेळाडूला पुढच्या हंगामासाठी रिटेन करता येणार नाही. पुढच्या वेळी त्याला लिलावातच उतरावे लागेल.
यंदाच्या हंगामात बदली खेळाडूच्या नव्या नियमासह दिल्ली कॅपिटल्सने ९ कोटींसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेला जेक फ्रेझर-मॅकगर्क हा ऑस्ट्रेलियन खेळाडू उर्वरित आयपीएलच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बांगलादेशाच्या मुस्तफिजुर रहमान याला ६ कोटींसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेआधी झालेल्या मेगा लिलावात २ कोटी मुळ किंमती त्याने नाव नोंदणी केली होती. पण तो अनसोल्ड राहिला होता. त्याला भाव मिळाल्यावर तो खेळणार की, नाही असाही मुद्दा सध्या चर्चेत आहे. कारण भारताचे विमान पकडण्याऐवजी तो दुबईला रवाना झाला आहे.१७ आणि १९ मेला बांगलादेश दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. तो या मालिकेनंतर दिल्ली कॅपिटल्सला जॉईन होणार की, मालिका संपवून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार तेही पाहण्याजोगे असेल.
Related
Articles
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार