E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच भाजपने संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. अशातच, भाजपने ५८ जिल्हा आणि शहराध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर केली असून, पुण्यात पुन्हा एकदा धीरज घाटे यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांच्याकडेच शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
धीरज घाटे हे गेल्या काही काळापासून भाजप पुणे शहराध्यक्ष पदावर कार्यरत असून, अनेक महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या असून, त्यांनी कार्यकारणीला अधिक वेळ देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. पक्षाने त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
भाजपकडून अलीकडेच राज्यभरात मंडळ आणि तालुका पातळीवर अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांच्या स्वाक्षरीने ही यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत ५८ शहर व जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
पुण्याच्या निरीक्षणाची जबाबदारी धनंजय महाडिकांकडे
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ आणि बारामती या भागांसाठी खासदार धनंजय महाडिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या देखरेखीखालीच पुण्यातील शहराध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले. अनेक नावांची चर्चा रंगत असतानाच, अखेर घाटेंच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय
महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक कधीही जाहीर होऊ शकते. अशा वेळेस भाजपकडून घेतलेला घाटेंवरील विश्वास महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुण्यात पुन्हा एकदा जोरदार ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असा विशवस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
महापौर भारतीय जनता पक्षाचाच होणार हा विश्वास : घाटे
लोकसभा निवडणूक खासदार, विधानसभेमध्ये ६ आमदार निवडून देत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे ५.५०लक्ष सदस्य नोंदणी करत भारतीय जनता पक्षाने येणार्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली . यामध्ये घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. यावर बोलताना घाटे पुढे म्हणाले, पक्षाने परत संधी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचे आभार घाटे यांनी मानले.
जिल्हाध्यक्षपदी प्रदीप कंद
पुणे जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष निवडण्यात येणार होते. यापैकी ेेशिरुर लोकसभा जिल्हा अध्यक्षपदासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांची पुन्हा निवड होण्यासाठी भाजपचा एक गट प्रयत्न करत होता. पण कंद यांच्यामागे जुन्या भाजप नेत्यांनी पाठबळ उभे केल्यामुळे कंद यांच्या नावाला पसंती देण्यात आली. ते जिल्हा बँकचे विद्यमान संचालक आहेत. जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप अध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आलेली नाही.
Related
Articles
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?