E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
Samruddhi Dhayagude
14 May 2025
काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात कारवाई
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर मंगळवारी उडालेल्या चकमकीत लष्कर ए तैयबाचा म्होरक्या शाहीद कुट्टे याच्यासह तीन दहशतवादी ठार झाले. शाहीद कुट्टे हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
भारतीय लष्कराने ऑपरेशन किलर मोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये शोपियाँ जिल्हा आहे. शुकरो केल्लार परिसरात दहशतवादी लपल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार सुरक्षा दलांनी काल कारवाई केली. परिसर सीलबंद करुन शोध मोहीम राबविली होती तेव्हा . दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख उत्तर दिले. चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, दहशतवादी लष्कर ए तैयबा संघटनेचे असून त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. शाहीद कुट्टे आणि अदनान शफी अशी त्यांची नावे आहेत. तिसर्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
कुट्टे हा शोपियाँच्या छोत्रीपुरा हेरापोराचा रहिवासी आहे. मार्च २०२३ मध्ये लष्कर ए तैयबा दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तो संघटनेतील वरिष्ठ म्होरक्या होत्या. त्याचा विविध दहशतवादी हल्ल्यांत समावेश आहे. त्यामध्ये १८ मे २०२४ रोजी हिरपोरा ग्रामपंचायतीचे भाजपच्या सरपंचांच्या हत्येत सहभाग आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात २६ एप्रिल रोजी त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले होते.
तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून देशविरोधी कारवायात सक्रिय होता. दरम्यान, ओळख पटलेला तिसरा दहशतवादी शफी हा शोपियाँचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये तैयबात सहभागी झाला होता. तो क श्रेणीतील दहशतवादी म्होरक्या होत्या. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी शोपियाँतील वाची येथे स्थलांतरीत मजुरांची हत्या झाली होती. त्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.
शस्त्रे, वैयक्तिक वस्तू सापडल्या
जवानांनी घटनास्थळावरून शस्त्रे आणि संपर्क यंत्रणा जप्त केली आहे. त्यामध्ये तीन एके ४७, ७ एके रायफली, दोन हातबाँब, स्फोटकांचे भाग, वॉकीटॉकी संच आणि गोळ्या यांचा समावेश आहे. त्याशिवाय दात घासण्याचे ब्रश, पेस्ट, ब्लेड आणि साबण, डायरी, नोटा, बॅटरी चार्जर यांचा समावेश होता.
तीन दहशतवाद्यांची पोस्टर लावली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आणखी तीन दहशतवाद्यांची पोस्टर शोपियाँ जिल्ह्यातील अनेक भागांत सैन्याने चिकटवली आहेत. सर्वजण लष्कर ए तैयबाचे दहशतवादी आहेत. हुसेन ठोकर, अली भाई (तल्हा भाई ) आणि हशीम मुसा (सुलेमान) अशी त्यांची नावे आहेत. ते दहशतवादी हल्ल्यांनंतर पळून गेले आहेत. त्यांचा शोध लष्कराकडून सुरूच आहे. त्यांची माहिती देणार्यास २० लाख रुपयांचे बक्षीस़ जाहीर केले आहे.
Related
Articles
आपत्तीग्रस्तांसाठी ४९ कोटीचा निधी
05 Jun 2025
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे : मुख्यमंत्री
04 Jun 2025
पावसामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर
06 Jun 2025
राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय
04 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?