E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
योग केवळ व्यायाम नव्हे; तर परिपूर्ण जीवनशैली
Wrutuja pandharpure
13 May 2025
योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांचे प्रतिपादन
पुणे
: योग हा केवळ शारिरीक व्यायाम नसून, एक परिपूर्ण जीवनशैली आहे. जो मन, शरीर आणि आत्मा यांचा समन्वय साधतो. यामध्ये आसने, प्राणायम आणि नैतिक तत्त्वांचा समावेश होतो. योगामुळे तणावमुक्ती, मानसिक शांती आणि शारिरीक स्वास्थ्य प्राप्त होते, ज्यामुळे जीवन आधिक संतुलित आणि समृद्ध होते, असे प्रतिपादन योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील अद्वैत बडवे स्मृती व्याख्यानात ‘योग-एक परिपूर्ण जीवनशैली’ या विषयावर डॉ. संप्रसाद विनोद बोलत होते.
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, अभिजात योग हे अनुभूतीजन्य ज्ञान आहे. अभिजात योगसाधना हे ‘स्व’ला जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. योगाकडे व्यापक जीवनशैली म्हणून पाहिले पाहिजे. योगाची व्याप्ती खूप मोठी असून ती समजण्यासाठी आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर ती एक जीवनशैली, एक तत्त्वज्ञान आहे. जे आपल्याला ‘स्व’ शी आणि विश्वाशी जोडते. योग हा एक प्रवास आहे. स्वतःकडे, सत्याकडे आणि शांतीकडे जाणारा प्रवास आहे. या प्रवासात कोणतीही स्पर्धा नाही, कोणतेही दडपण नाही. शारिरीक पातळीवर शरिराच्या हालचाली करण्यासाठी आपल्या शरिराचे इतर घटक मन, बुद्धी एकमेकांशी जोडली गेली पाहिजे. योगाचा अभ्यास आत्मबोधासाठी केला पाहिजे, असेही यावेळी डॉ. संप्रसाद विनोद यांनी सांगितले.
योगसाधना ओढून-ताणून करता येत नाही. त्यासाठी आत्मबोध होणे हे योगाचे उद्दिष्ट आहे. योगाची संकल्पना आपण समजून आचारणात आणण्याची गरज आहे. विचाराची प्रचिती येणे म्हणजे ध्यान. अज्ञानाचे ज्ञान करुन घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या शरिरातील चैतन्यशक्ती जागी करण्यासाठी शरिराची ओळख करुन घेतली पाहिजे, असेही यावेळी डॉ. संप्रसाद विनोद यांनी सांगितले. मनाशी आणि विचारांशी मैत्री झाली पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. प्रस्ताविक सूत्रसंचालन संपदा लोहगावकर यांनी केले.
Related
Articles
अनैसर्गिक संबंधास नकार दिल्याने हत्या
07 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
जुन्नर तहसील कार्यालयात खासगी दलालांचा सुळसुळाट
07 Jun 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?