एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा   

दौंड, (वार्ताहार) : दौंड तालुक्यातील खडकी गावातून जाणार्‍या पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटी स्थानकावर बस न थांबवल्याने ग्रामस्थ आणि चालक, वाहकांमध्ये हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी पुढील तपास करत आहेत. 
 
याबाबत बस चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे (वय ३४ वर्षे, रा. बामनी पोस्ट गलसांघवी. जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली असून, आरोपी प्रविण काळे (वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे) याने रोडच्या मध्यभागी उभे राहून सोलापूर बाजूकडून पुणे बाजूला जात असणार्‍या अहमदपूर-परळ या एसटी बसला दागड मारला. यावेळी एसटी चालक, वाहक आणि इतर सहा आरोपींमध्ये बाचाबाची झाली. ही घटना खडकी गावच्या हद्दीत सोलापुर-पुणे महामार्गावरील बस स्थानकाजवळ घडली. 

Related Articles