E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कोण आहेत विक्रम मिस्री?
Samruddhi Dhayagude
12 May 2025
तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव
भारताने गेल्या आठवड्यांत केवळ तीन चेहरे प्रत्येक स्क्रीनवर पहिले, शोधले आणि कौतुक केले. यातील विक्रम मिस्त्री हे एक नाव. जाहिरात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये नोकरी... त्यानंतर थेट तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव...असा अभिमानास्पद प्रवास आहे. भारताने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीचे अतिशय शांतपणे त्यांनी माहिती दिली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणारे विक्रम यांच्या कारकिर्दीविषयी सर्व जाणून घेऊ.
काश्मीरचे सुपुत्र विक्रम यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९६४ मध्ये श्रीनगर मध्ये झाला. भारत-पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाबद्दल माहिती देणारे परराष्ट सचिव विक्रम मिस्री यांचे एक्स सोशल मीडिया अकाऊंट प्रोटेक्टेड मोडवर दिसले. शस्त्रसंधीनंतर त्यांना आणि त्यांच्या मुलीला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
शिक्षण आणि कुटुंबीय
विक्रम मिस्री यांचे प्राथमिक शिक्षण श्रीनगर आणि उधमपूरमध्ये झाले. शालेय शिक्षणानंतर ते ग्वालियरच्या सिंधिया स्कूलमध्ये आले.ग्वालियरमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दिल्लीला आले. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून इतिहासात पदवी घेतली. त्यानंतर विक्रम मिस्री यांनी जमशेदपूर येथील एक्सएलआरआय संस्थेतून एमबीएची पदवी घेतली. सनदी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी जाहिरात आणि ऍड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले.विक्रम मिस्त्री यांच्या कुटुंबात पत्नी डॉली आणि दोन मुले असे आहेत.
कारकीर्द
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, विक्रम मिस्री हे भारतीय विदेश सेवेच्या १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले. यात त्यांनी युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत वेगवेगळ्या दूतावासात अधिकारी म्हणून सेवा बजावली.
विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान डेस्कवरही काम केले आहे. त्याचबरोबर ते इंद्र कुमार गुजराल आणि प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री असताना त्यांच्या टीममध्येही होते.
विक्रम मिस्री यांनी ब्रसेल्स, ट्यूनिस, इस्लामाबाद आणि वॉशिंग्टन डीसीमध्येही काम केले आहे. ते श्रीलंकेत भारताचे उप उच्चायुक्त आणि म्यूनिचमध्ये भारताचे कन्सूल जनरल होते.
विक्रम मिस्री यांना पंतप्रधान कार्यालयातील देखील अनुभव आहे. ते पंतप्रधान कार्यालयाचे संयुक्त सचिव म्हणून सेवेत होते. मिस्री यांनी भारताच्या तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम केले आहे.
विक्रम मिस्री माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव होते. १५ जुलै २०२४ रोजी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.
विक्रम मिस्री यांनी उच्चायुक्त म्हणून २०१४ मध्ये स्पेन, २०१६ मध्ये म्यानमार आणि २०१९ मध्ये चीनमध्ये सेवा केली. मिस्री यांनी भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून २०२२ ते २०२४ पर्यंत काम पाहिले आहे. त्यांना हिंदी, इंग्रजी आणि काश्मिरी भाषा येतात. फ्रेंच भाषेचेही त्यांना चांगले ज्ञान आहे.
Related
Articles
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
4
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
5
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
6
बाजारात हिमालयातील फळांना मागणी