E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
Samruddhi Dhayagude
12 May 2025
१ जूनपासून उपक्रम; शहरातील १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील तब्बल १० लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना ’रोड सेफ्टी ट्रेक’ या उपक्रमाद्वारे, वाहतूक नियमांविषयी जागरूकता करण्याचे उदिष्ठ्ये ठरविले आहे. येत्या १ जूनपासून सुरू होणार्या या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
आरटीओ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सुमारे ८ हजार शाळा आहेत. विद्यार्थ्यांची संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना रस्ता सुरक्षा व नियमांचे शिक्षण देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. दर शनिवारी दिवेघाट येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. एका दिवसात सुमारे ६०० विद्यार्थी यात सहभागी होतील. निसर्गरम्य वातावरणात खेळ आणि मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांची माहिती दिली जाईल. सासवड येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे.
दर शनिवारी विद्यार्थ्यांचा नो बॅगेज डे असतो, त्याच दिवशी आरटीओ कडून दिवेघाट येथील ६ हजार देशी-विदेशी झाडांचे विद्यार्थ्यांना पर्यटन ट्रेक घडविण्यात येणार आहे. त्यानंतर येथेच आरटीओ कडून क्लासरूम तयार करण्यात आली आहे. या क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत. येथील सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसोबत रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणारी सापशिडी व अन्य खेळ खेळून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम राबवण्यामागे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची संकल्पना आहे. या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर स्कूल बस चालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना आग विझवणारे यंत्र कसे हाताळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचे ज्ञान देण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला रस्ते सुरक्षा किट मिळेल, ज्यात दिशादर्शक, स्टिकर्स, शुभेच्छापत्रे आणि महत्त्वाचे रस्ते सुरक्षा संदेश असलेले फ्रेंडशिप बँड असतील.
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे महत्त्व पटवून देणार
लहान वयात एखादी गोष्ट मुलांना शिकविल्यास ती कायमच त्यांच्या लक्षात राहते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती दिली जाणार आहे. ’रोड सेफ्टी ट्रेक’ च्या माध्यमातून आम्ही एक अशी पिढी तयार करत आहोत, जी स्वतः तर नियमांचे पालन करेलच, पण इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करेल. पुणे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देणे हे आमचे ध्येय आहे.
- अर्चना गायकवाड, आरटीओ, पुणे
Related
Articles
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
30 May 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द
29 May 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार