नवी दिल्ली : भारताची धावपटू संजीवनी जाधव हिने महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला. तिने ३३:०८.१७ सेकंद अशी वेळ नोंदविली. तर सीमा हिने ३३:०८.२३ अशी वेळ नोंदवत सहावा क्रमांकाला गवसणी घातली. या स्पर्धेत कझाकिस्तानच्या डेझी जेपकेमी हिने ३०:४८.४४ अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली. तर तिच्या नंतर जपानच्या रिरेक हिरोनिका हिने ३०:५६.३२ अशी वेळ तर मिकुनी यादा हिने ३१:१२.२१ अशी वेळ नोंदवली.
Fans
Followers