E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
खरीप पिकाच्या आधार किमतीत वाढ
Samruddhi Dhayagude
29 May 2025
नवी दिल्ली : केंद्र सरकारने धान, डाळी आणि तेलबियांच्या किमान आधार किमतीत बुधवारी वाढ केली. भाताच्या किमान आधार किमतीत ३ टक्के आणि डाळी व तेलबियांच्या किमान आधार किमतीत ९ टक्क्यांनी वाढ केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन खरीप हंगामासाठी किमान आधार किमतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
यंदा मान्सून (नैऋत्य वारे) नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारने ही घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधार किमतीत (एमएसपी) ६९ रुपयांची वाढ करून, ती २,३६९ रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली. शेतकर्यांच्या हितासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेेत, असे वैष्णव यावेळी म्हणाले. यामध्ये खरीप पिकांची किमान आधार किंमत आणि व्याजावरील अनुदानाचा समावेश आहे, असे ते म्हणाले.
२०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी ’सामान्य’ आणि ’अ’ श्रेणीच्या धानाच्या जातींसाठी किमान आधार किंमत अनुक्रमे २,३६९ रुपये प्रति क्विंटल आणि २,३८९ रुपये प्रति क्विंटल अशी प्रत्येकी ६९ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. हायब्रीड ज्वारीची आधार किंमत ३२८ रुपयांनी वाढवून ३,६९९ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. तर, आणि मालदांडी ज्वारीची किमान किंमत ३,७४९ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. मका १७५ रुपयांनी वाढवून २,४०० रुपये प्रति क्विंटल आणि बाजरीची किमान आधार किंमत १५० रुपयांनी वाढवून २,७७५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली.
देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी डाळींच्या किमान आधार किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.९६ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. तर, तेलबियांच्या किमान आधार किमतीत ९ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली.तूर डाळीची आधार किंमत ४५० रुपयांनी वाढवून ८,००० रुपये प्रति क्विंटल, उडीद डाळीची किमान आधार किंमत ४०० रुपयांनी वाढवून ७,४०० रुपये प्रति क्विंटल आणि मुगाची किमान आधार किंमत ८६ रुपयांनी वाढवून ८,७६८ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. त्याचप्रमाणे, २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी भुईमूगाची किमान आधारभूत किमत ४८० रुपयांनी वाढवून ७,२६३ रुपये प्रति क्विंटल, सोयाबीनची किमान किंमत ४३६ रुपयांनी वाढवून ५,३२९ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. कापसाच्या किमान आधारभूत किमतीत २०२५-२६ साठी प्रति क्विंटल ५८९ रुपयांची वाढ करण्यात आली.
Related
Articles
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस पाळणा तुटून उद्योजकाचा मृत्यू
19 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
6
ठेवींवरील व्याज घटणार