नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्‍यासह बैल बुडाला   

छत्रपती संभाजीनगर : मुलीची भेट घेऊन घरी येत असताना शेतकर्‍याने बैलगाडी घेऊन तलावातून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. मात्र लेकीची ही शेवटची ठरली. कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळीच्या वाघ नाल्याच्या पाण्यातुन बैलगाडी घेऊन मार्गस्थ होताना शेतकर्‍यासह एका बैलाचा बुडून मुत्यु झाल्याची घटना घडली आहे.   
 
कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६) असे पाण्यात बुडुन मृत झालेल्या शेतकर्‍यांचे नाव आहे. कैलास कोरडे बैलगाडीने वाघ नाल्याच्या पाण्यातून आपल्या लेकीकडे पळसवाडी येथे गेले होते. ते सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परत त्याच नाल्यातुन येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मोठ्या खड्ड्यात बैलगाडीसह बुडाले.
 
छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जैतापूर ते हतनूर हद्दीच्या मध्यभागी शिवना टाकळी प्रकल्प पाण्याच्या तुंबारा असलेल्या वाघ नाल्यात शेतकर्‍यांसह बैलगाडी बुडाल्याची घटना सोमवारी घडली.

दुसर्‍या दिवशी सापडला मृतदेह 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व देवगाव रंगारी पोलिस पथकाच्या मदतीने पाण्यात रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम केले होते. मात्र कोरडे यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान मंगळवारी सकाळी सहा वाजता पाण्यात कोरडे यांचा मृतदेह सापडला. यानंतर बाळू परांडे, उमेश कोरडे यांनी पाण्यात जाऊन मृतदेह बाहेर काढला. 
 

Related Articles