E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाचा युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला ; १३ जणांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
26 May 2025
युक्रेनच्या विविध शहरांवर डागली ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे
कीव : रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. ज्यामध्ये युक्रेनच्या विविध शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात झायटोमिरमध्ये तीन मुलांसह १३ नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक जणजखमी झाले आहेत. कीव, खारकिव, मायकोलायव्ह, टेर्नोपिल आणि खमेलनित्स्की यांसारख्या प्रमुख शहरांवर हल्ला झाला.
युक्रेनच्या हवाई दलाने २६६ ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्र पाडली, परंतु असे असूनही अनेक इमारती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. हा युद्धातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे. राजधानी कीवमध्ये ११ जण जखमी झाले. तसेच खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी झालेल्या आणखी एका ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लगेचच शनिवारी रात्री हा हल्ला झाला आहे.
रशियावर निर्बंध घालावेत : झेलेन्स्की
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशिया विरुद्ध अधिक कडक निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले, की अमेरिकेसह जगातील इतर देशांचे मौन पुतिन यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसत आहे. दबावाशिवाय काहीही बदलणार नाही, रशिया आणि त्यांचे सहयोगी देश पाश्चात्य देशांमध्ये अशा हत्यांसाठी फक्त सैन्य उभारतील, असे त्यांनी नमूद केले.
दबावाशिवाय काहीही बदलणार नाही. रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्र पाश्चात्य देशांमध्येही अशाच प्रकारच्या नरसंहाराची तयारी करतील. मॉस्कोकडे शस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत ते लढतील असे झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रेई यरमाक यांनी समाज माध्यमावर म्हटले आहे. रशियाने दावा केला की, त्यांनी अवघ्या चार तासांत युक्रेनचे ९५ ड्रोन पाडले, त्यापैकी १२ मॉस्कोजवळ होते.
युक्रेनकडून पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न
कुर्स्क : रशियाने युक्रेनमधील अनेक भागांवर शेकडो ड्रोन हल्ले केल्यानंतर युक्रेनने थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना लक्ष्य केले आहे. युक्रेनकडून पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, रशियन सैन्याने वेळीच सतर्क होऊन हे ड्रोन नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली. रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचे हेलिकॉप्टर जात असताना युक्रेनकडून हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत, हे ड्रोन पुतीन यांच्या उड्डाण मार्गात येण्यापूर्वीच नष्ट केले. या घटनेत कुणाला दुखापत झाल्याचे किंवा पुतीन यांच्या ताफ्यातील कुणाला काही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेची रशियाच्या सुरक्षा यंत्रणांकडून पूर्ण चौकशी केली जात आहे. युक्रेनचे ड्रोन कुर्स्कसाख्या संवेदनशील भागात कसे पोहोचले, याचा शोध घेतला जात आहे. त्याबरोबरच हा हल्ला पुतीन यांना लक्ष्य करून करण्यासाठीच करण्यात आला होता, की केवळ दबावतंत्राचा भाग होता, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र याबाबत युक्रेन सरकार आणि सैन्यदलाकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Related
Articles
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
‘ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वाढ, रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली’
19 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
‘ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वाढ, रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली’
19 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
‘ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वाढ, रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली’
19 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
वारकर्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू
20 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
‘ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वाढ, रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली’
19 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला