टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी   

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माने आता या टी२० लीगमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. रविवारी, विदर्भ प्रो टी लीगचा अंतिम सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नेको मास्टर ब्लास्टर्स आणि पगारिया स्ट्रायकर्स यांच्यात खेळला गेला. दुसरीकडे, जितेश शर्माच्या संघाने अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे.
 
विदर्भ प्रो टी लीगच्या अंतिम सामन्यात पगारिया स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करत १७९ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना एईसीओ मास्टर ब्लास्टर संघाने चांगली सुरुवात केली. वेदांत दिघाडे आणि अध्यायन डागा यांनी ३५ धावांची भागीदारी केली, परंतु त्यानंतर डागा चांगली कामगिरी करू शकले नाहीत व ते बाद झाले. आर्यम मेश्रामनेही २६ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. कर्णधार जितेश शर्माने ५व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि ११ चेंडूत ३० धावांची खेळी केली. २७२.७२च्या स्ट्राईक रेटने ३ षटकार आणि १ चौकार मारला. संघाला १४ चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना, जितेशने षटकार मारून संघाला सामना जिंकून दिला.
 
यापूर्वी, कर्णधार जितेश शर्माने सेमीफायनल सामन्यात इंडिया रेंजर्सविरुद्ध २२ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती. ज्यामुळे त्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. जितेश आयपीएल २०२५ मध्येही खेळताना दिसला होता. जितेश शर्माने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद ८५ धावा केल्या. याशिवाय, अंतिम सामन्यातही २४ धावा जोडल्या गेल्या.

Related Articles