‘ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वाढ, रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली’   

नवी दिल्ली : भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र देशाच्या आर्थिक वाढ, रोजगारनिर्मिती व जागतिक स्पर्धात्मकतेची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी केले.दिल्ली-एनसीआर येथील ऑटोमोबाईल डिझाइन आणि व्यवस्थापनासाठी समर्पित भारतातील पहिली संस्था ‘इंडियन स्कूल फॉर डिझाइन ऑफ ऑटोमोबाइल्स’च्या पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते.व्हर्च्युअल माध्यमातून ते यात सहभागी झाले.
 
पंतप्रधानांनी मांडलेल्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाकडे वाटचाल करत असताना, आपला ऑटोमोबाईल उद्योग किफायतशीर उत्पादनावरून आता गुणवत्ताकेंद्रित, स्मार्ट रचना, मजबूत सुरक्षितता व शाश्वत उपाययोजनांकडे झपाट्याने वाटचाल करत आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.आयएनडीईए ही शैक्षणिक संस्था ऑटोमोबाईल डिझाइन आणि व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आली आहे. 
 
एक्सएलआरआय, दिल्ली-एनसीआरचे संचालक फादर डॉ. के. एस. कासिमिर म्हणाले, तांत्रिक कौशल्य आणि उद्योग संरेखन यांचा अखंड संगम या संस्थेत राहील. आयएनडीईएचे संस्थापक अविक चट्टोपाध्याय म्हणाले,  आयएनडीईए ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून, भारताच्या डिझाईन क्षमतेला चालना देणारी चळवळ आहे. 

Related Articles