वारकर्‍यांसाठी फिरता दवाखाना उपक्रम सुरू   

पुणे : सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकर्‍यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, १० सुसज्ज मोठ्या रुग्णवाहिका, पाच दुचाकी रुग्णवाहिका व ३०० हून अधिक डॉक्टर्स, परिचारिका आणि स्वयंसेवकांची टीम काम करणार आहे. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्यसेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाते. पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल.
 
सेनापती बापट रस्त्यावरील ’सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी ’सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई, ’सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते अविनाश साळवे, अभियंता प्रशांत वाघमारे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. रमण, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे आदी उपस्थित होते.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, सलग २५ वर्षे अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, एका रुग्णवाहिकेपासून सुरू झालेला हा प्रवास दहाहून अधिक गेला आहे. 
 

Related Articles