E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मालमोटार चालकाकडून पैसे उकळणारा पोलिस निलंबित
Wrutuja pandharpure
25 May 2025
पुणेः
मालमोटारचालकाकडून पैसे उकळणार्या पोलीस कर्मचार्याला परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. बापूराव पोपट ढोले असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. मालमोटारचालक राहुलकुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हा मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन १५ एप्रिल रोजी निघाला होता. त्या वेळी पोलीस कर्मचारी ढोले मोटारीतून निघाले होते. त्यांनी मालमोटार अडवला आणि मोबाइलवर बोलत असल्याचा आरोप मालमोटारचालक यादव याच्यावर केला. ढोले यांनी मालमोटारचालकाकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा ट्रकचालक यादवने एवढे पैसे नाहीत. माझ्याकडे दहा हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी चालक यादवला मोटारीतून खेड शिवापूर परिसरात नेले. तेथे त्याला धमकावून एका पेट्रोल पंपावर नेले.
पेट्रोल पंपावरील कर्मचार्याला ऑनलाइन पैसे रोख स्वरुपात देण्यास सांगितले. तेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचार्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर यादवला घेऊन ढोले एका दुकानात गेले. यादवने दुकानदाराला ऑनलाइन दहा हजार रुपये पेसे पाठविले. दुकानदाराकडून दहा हजार रुपये रोख स्वरुपात घेण्यात आले. त्यानंतर यादवने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राजगड पोलिसांनी ढोले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ढोले यांनी माफी मागून मालमोटारचालक यादवला दहा हजार रुपये परत केले. याबाबतचा अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना पाठविण्यात आला. त्यांनी संबंधित अहवाल परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना सादर केला.ढोले यांची चौकशी करण्यात आली. त्याच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त कदम यांनी दिले.
Related
Articles
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा
18 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत