E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
तुतारी चिन्हावर लढवली होती भोसरी विधानसभा
पिंपरी
: विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा गट समर्थकांसह पुन्हा स्वगृही अजित पवार गटात परतणार असल्याची चर्चा आहे.दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महायुतीत संधी नसल्याने शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत अपयश आले. पराभवानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने गव्हाणे यांना प्रवेशासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि सुलभा उबाळे यांच्यामार्फत गळ घातली.
तेव्हा गव्हाणे यांनी महामंडळाऐवजी विधान परिषद देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबतच जावे, असा आग्रह धरला. यादरम्यान अजित पवार गटही सतर्क झाला. गव्हाणे यांचे मन वळविण्यात माजी आमदार विलास लांडे यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, याबाबत गव्हाणे यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती.आता महापालिका निवडणुकीची सज्जता सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची गव्हाणे यांनी भेट घेतली. त्यामुळे गव्हाणे स्वगृही परततील अशी चर्चा आहे.
यासंदर्भात अजित गव्हाणे म्हणाले, मतदारसंघासह शहरातील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी मतदारसंघासह शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. आमच्या गटाच्या प्रवेशाबाबत विषय निघाला. लवकरच सर्व सहकारी यांच्याशी बोलून चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेऊ.
Related
Articles
दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने
07 Jul 2025
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
11 Jul 2025
हवाई दलाचे विमान राजस्तानमध्ये कोसळले
10 Jul 2025
५० हजार भाविकांकडून अमरनाथचे दर्शन
07 Jul 2025
‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’
12 Jul 2025
जागतिक वारसा टिकविण्यासाठी किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे तोडा
13 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
5
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
6
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज