५० हजार भाविकांकडून अमरनाथचे दर्शन   

जम्मू : अमरनाथकडे रविवारी ७ हजार २०० भाविकांची आणखी एक तुकडी रवाना झाली. ३८ दिवसांची यात्रा असून ती ३ जुर्लैपासून सुरू झाली आहे. आतापर्यत  आतापर्यंत ५० हजार भाविकांनी ३ हजार ८८० मीटर उंचीवरील अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. 
 
पाचव्या तुकडीत ७ हजार २०८ यात्रेकरु आहेत त्यात १ हजार ५८७ महिला आणि ३० मुले आहेत. भगवतीनगर येथील बेस कॅम्प येथून दोन मार्गाने यात्रेकरु रवाना झोल. दरम्यान, जम्मू येथून ३१ हजार ७३६ यात्रेकरु काश्मीर खोर्‍याकडे रवाना झाले. पहिल्या तुकडीत ३ हजार १९९ यात्रेकरुन १३७ वाहनांतून रवाना झाले. पाठोपाठ १४ किलोमीटरच्या बलताल मार्गाने ४ हजार ९ भाविकांची १६० वाहने अनंतनाग जिल्ह्यातील पहलागाम येथील ४८ किलोमीटरच्या यात्रेसाठी रवाना झाली. जम्मू परिसरात रात्री  मुसळधार पाऊस कोसळला.
 

Related Articles