‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’   

पुणे : लोकमान्य टिळक यांचे विविध पैलू, विचार व कार्य या वक्तृत्व स्पर्धेतून समजून घेता येतात. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून हे विचार आत्मसात करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष व ‘केसरी’चे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांनी केले.
 
लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहण्यासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू व ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, टिमविच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणति रोहित टिळक, टिमविच्या शालेय प्रसारक परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा सरिता साठे, टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर, टिळक विचार मंचाचे अध्यक्ष शैलेश टिळक, कुणाल टिळक, रौनक रोहित टिळक, प्रदीप खरे, कल्पना खरे, सुमित खरे  उपस्थित होते. अनाथ हिंदू महिलाश्रम, लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे ज्युदो असोसिएशन, श्री शिवाजी मंदिर संस्था, टिळक स्मारक ट्रस्ट, वसंत व्याख्यानमाला, केसरी-मराठा कामगार युनियन, लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणेश मंडळाचे (विंचूरकरवाडा) रवींद्र पठारे, पुणे सार्वजनिक सभा, महाराष्ट्र ब्राह्मण समाज, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव या संस्था व संस्थेच्या पदाधिकार्‍यांतर्फे लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सूत्रसंचालन सारिका तांबे यांनी केले. शलाका मुळे यांनी आभार मानले.
 

Related Articles