E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
महापालिकेच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर
पुणे
: राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक कार्यक्रम गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये २२ जुलै रोजी प्रारुप तर ४ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यानंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांना आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश काढले. यानंतर नगर विकास विभागाने गुरुवारी ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार ११ ते १६ जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, १७ आणि १८ जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे, १९ ते २३ जून स्थळ पाहणी करणे, २४ ते ३० जून गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे, १ ते ३ जुलैला नकाशात निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणी करणे. ४ ते ७ जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षर्या करणे, ८ ते १० जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे, त्यास राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, २२ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, ३१ जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविणे, ०१ ते ११ ऑगस्ट प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकार्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे. प्राधिकृत अधिकार्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे, २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणार आहेत. राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबरपर्यंत प्रभागांची रचना जाहीर होणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होईल. त्यानंतर कधीही महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात.
११ ते १६ जून प्रगणक गटाची मांडणी करणे
१६ ते १८ जून प्रगणक माहिती तपासणे
२२ ते ३१ जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे
१ ते ११ ऑगस्ट हरकती, सूचनांवर सुनावणी घेणे
१२ ते १८ ऑगस्ट प्रभाग रचना आयोगाला पाठविणे
२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे
शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा या शक्यतो दिवाळीपूर्वी असतात. त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास मतदान केंद्र, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक आणि इतर कर्मचार्यांना ड्युटी लावणे अडचणीचे होणार आहे. पालिकांच्या निवडणुका या दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांनी वर्तवली आहे.
Related
Articles
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार
10 Jul 2025
विदर्भात पावसाचा कहर
11 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
युरोपात उष्णतेची लाट; २ हजार ३०० नागरिकांंचा मृत्यू
11 Jul 2025
भिती दाखवून वारंवार पैसे उकळणार्या पोलिसांवर कारवाई
07 Jul 2025
वाराणसीमध्ये गंगेला पूर
09 Jul 2025
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार
10 Jul 2025
विदर्भात पावसाचा कहर
11 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
युरोपात उष्णतेची लाट; २ हजार ३०० नागरिकांंचा मृत्यू
11 Jul 2025
भिती दाखवून वारंवार पैसे उकळणार्या पोलिसांवर कारवाई
07 Jul 2025
वाराणसीमध्ये गंगेला पूर
09 Jul 2025
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार
10 Jul 2025
विदर्भात पावसाचा कहर
11 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
युरोपात उष्णतेची लाट; २ हजार ३०० नागरिकांंचा मृत्यू
11 Jul 2025
भिती दाखवून वारंवार पैसे उकळणार्या पोलिसांवर कारवाई
07 Jul 2025
वाराणसीमध्ये गंगेला पूर
09 Jul 2025
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार
10 Jul 2025
विदर्भात पावसाचा कहर
11 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
युरोपात उष्णतेची लाट; २ हजार ३०० नागरिकांंचा मृत्यू
11 Jul 2025
भिती दाखवून वारंवार पैसे उकळणार्या पोलिसांवर कारवाई
07 Jul 2025
वाराणसीमध्ये गंगेला पूर
09 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
5
रशियाचा हवाई तळ उडवला
6
पंढरीत १५ लाखांवर वैष्णव