बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अ‍ॅप' लवकरच   

UIDAI च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

पाटणा : बिहारमध्ये मतदार यादीच्या ‘विशेष सखोल तपासणी’वर (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) वाद निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने रविवारी (७ जुलै) बचावात्मक पवित्रा घेत अर्जाबरोबरच कागदपत्रे सादर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (UIDAI) सीईओ भुवनेश कुमार यांनी म्हटले आहे की “आधार हे ओळखपत्र म्हणून कधीच अनिवार्य नव्हते.”
 
कुमार यांनी नुकतीच खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी देशात बऱ्याच ठिकाणी बनावट आधार कार्ड  केल्याच्या घटना घडत आहेत. या मुद्द्याकडे लक्ष्य वेधले. तसेच यूआयडीएआय बनावट आधार कार्ड्सना कसे रोखणार याचा रोडमॅपही त्यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, “आधार कार्डमध्ये क्यूआर कोड असतो. त्यामध्ये अंगभूत सुरक्षा यंत्रणा आहे.”
 
भुवनेश कुमार म्हणाले, “यूआयडीएआयने जारी केलेल्या नवीन आधार कार्डांवर एक क्यूआर कोड असतो. तसेच आम्ही एक क्यूआर कोड स्कॅनर अ‍ॅपही विकसित करत आहोत. जे आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या अ‍ॅपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्याशी संबधित माहिती अ‍ॅपवर दिसेल. आधार कार्डवरील व अ‍ॅपवरील माहिती जुळवून पाहता येईल आणि त्याद्वारे बनावट आधार कार्ड ओळखता येईल. तसेच या अ‍ॅपद्वारे हा प्रकार थांबवता येईल.”
 
“काही ठिकाणी फोटोशॉप व छापील टेम्प्लेट्सचा वापर करून हुबेहुब खऱ्या आधार कार्डसारखे दिसणारे कार्ड लोकांनी बनवल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र यूआयडीएआयच्या अ‍ॅपद्वारे खरं आधार कार्ड ओळखता येईल. हे अ‍ॅप सादर करण्याच्या (लॉन्च) अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते सादर केले जाईल. या संबंधीचा एक डेमो आधीच तयार करण्यात आला आहे.
 
कुमार यांनी यावेळी या अ‍ॅपचे आणखी काही फायदे सांगितले. ज्या ठिकाणी आधार कार्ड डिजीटल पद्धतीने शेअर केलं जात असेल तिथे आधार कार्डधारकाच्या परवानगीने डिजीटल पद्धतीने आधार कार्ड शेअर करता येईल, असे ही त्यांनी सांगितले.

 

Related Articles