विदर्भात पावसाचा कहर   

नागपूर : विदर्भात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मृत्यूच्या सत्राने हाहाकार उडवला आहे. पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाला आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या चार जिल्ह्यांत पावसामुळे तब्बल सहा जणांना जीव गमवावा लागला तर यवतमाळमध्ये पुरात एक व्यक्ती वाहून गेला आहे. नागपूरच्या नरसाळा हुडकेश्वर भागात एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यात मागील १२ तासांत सरासरी १३७.४ मिमी पाऊस झाला. 
 
नदी व नाल्यांच्या पुरात दोघे वाहून गेले असून, यातील एकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. अनिल पानपत्ते (वय ४०, रा. बोरगाव बुजुर्ग, ता. कळमेश्वर) व कार्तिक लाइसे (वय १८, रा. उप्पलवाडी, ता. नागपूर ग्रामीण) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पावसामुळे बोरगाव (बु) गावालगतच्या नाल्याला पुलावरून पाणी वाहत असताना अनिलने बुधवारी सकाळी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रवाहात वाहून गेला. रत्याचा थांगपत्ता लागला नाही. कार्तिक लाडसे हा त्याच्या गावालगतच्या नाल्यात बुधवारी सकाळी वाहून गेला. दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. 
 
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे धावत्या कारवर रस्त्यालगतचे झाड कोसळल्याने कारमधील दोघे ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी शहरातील आरामशीनसमोर घडली. तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी  सकाळी शहरातील आरामशीनसमोर घडली. तीन जण बुधवारी सकाळी मोटारीने उमझरी मध्यम प्रकल्प येथे मासे आणण्यासाठी निघाले होते. 
 

Related Articles