युरोपात उष्णतेची लाट; २ हजार ३०० नागरिकांंचा मृत्यू   

ब्रुसेल्स : मागील आठवड्यात तीव्र उष्णतेच्या लाटेत १२ युरोपीय शहरांमध्ये उष्णतेशी संबंधित कारणांमुळे जवळपास २ हजार ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.या अभ्यासात २२ जून ते २ जुलै या दिवसांचा अभ्यास करण्यात आला.  या दहा दिवसांत पश्चिम युरोपच्या मोठ्या भागांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. स्पेनमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडले होते आणि फ्रान्समध्ये जंगलात वणवे भडकले होते. या अभ्यासात बार्सिलोना, माद्रिद, लंडन आणि मिलानसह १२ शहरांचा समावेश होता. जिथे उष्णतेच्या लाटांमुळे तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली.
 
इम्पीरियल कॉलेज लंडन आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, या कालावधीत झालेल्या दोन हजार ३०० मृत्यूंपैकी १ हजार ५०० मृत्यू हवामान बदलाशी संबंधित होते.उष्णतेच्या लाटेच्या या घटना सामान्यतः जुलैच्या मध्यात किंवा ऑगस्टमध्ये घडतात. जूनच्या मध्यापासून जुलैच्या सुरुवातीपर्यंत पसरलेल्या उष्णतेच्या लाटांनी स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि यूकेसह पश्चिम आणि दक्षिण युरोपच्या बर्‍याच भागांना प्रभावित केले.
 

Related Articles