E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ग्रामविकासाचे ’दळवी मॉडेल’ अभ्यासक्रमाचा भाग व्हावे
Wrutuja pandharpure
26 May 2025
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे प्रतिपादन
पुणे
: ग्रामविकासाच्या आदर्श पॅटर्नचे चंद्रकांत दळवी यांनी साकारलेले प्रारूप गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित राहू नये. ग्रामविकासाचे हे ’दळवी मॉडेल’ सर्वत्र पोहोचावे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावे. त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा व दिशा मिळावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले.
चंद्रकांत दळवी नावाच्या व्यक्तीने शून्यातून सुरवात केली. सातत्य, चिकाटी, संयम आणि लोकसहभागाचा मंत्र जपत ग्रामविकासाचे मॉडेल उभे केले. असे समविचारी दळवी मोठ्या संख्येने तयार व्हावेत, असेही पाटेकर म्हणाले.
माजी आयएएस अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून परिपूर्ण व स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपाला आलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) या गावाची प्रगतशील वाटचाल उलगडणार्या ’निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते. या पुस्तकाला नाना पाटेकर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फॉर्म्सचे विलास शिंदे होते. याप्रसंगी चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, तबाजी कापसे, संजीव कोलगोड एस. बी. प्रॉडक्शन्सचे शंकर बारवे आदी उपस्थित होते. यावेळी ’निढळ गाव: परिवर्तनाचा प्रवास’ या माहितीपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण झाले. सत्व फाऊंडेशनच्या वतीने माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
नाना पाटेकर म्हणाले, चंद्रकांत दळवी सातत्याने ४१ वर्षे हे काम करत आहेत. शासकीय सेवेतील महत्त्वाची पदे भूषवत असताना,तथाकथित विकास करणे दळवींना सहज शक्य होते. पण त्यांना अभिप्रेत ग्रामविकासाचे प्रारूप निराळे होते. सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि लोकवर्गणी यांच्या माध्यमातून त्यांनी ९० टक्के शासकीय योजनांच्या मदतीनेच ही किमया घडवून आणली आहे. त्यांच्या ग्रामविकासाला सामूहिकतेची जोड आहे. पराकोटीचे सातत्य, संयम, धीर आणि दळवींमधील नेतृत्वगुणांचे हे फलित आहे. समविचारी लोक जमवणे कठीण असते. समृद्धीची प्रत्येकाची कल्पनाही वेगळी असते.
चंद्रकांत दळवी म्हणाले, शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना, राज्याची धोरणे ठरविण्याच्या महत्त्वाच्या कामात मला सहभागी होता आले. प्रत्येक पदावर काम करताना राज्याच्या हिताची एक तरी योजना ठरवण्याची संधी मिळाली. पण गावात प्रत्यक्ष काम करणे आव्हानात्मक होते. धोरणे चांगली असतील, तर विकासाचे प्रारूप लोकसहभागातून शक्य होते, याचे उदाहरण आता उभे राहिले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजकार्याचे माडेल उभे राहिले आहे. हे पुस्तक लवकरच इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध होईल. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामविकासाची अशी मॉडेल्स उपयोगी ठरतील. निढळ गावाच्या विकासाच्या ९० टक्के योजना शासकीय माध्यमातूनच राबविल्या आहेत.
’निढळ पॅटर्न’ हे ग्रामविकासाचे उत्तम दस्तऐवजीकरण असून, आगामी काळात ते दिशादर्शक ठरेल, असे पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण म्हणाले. कैलास कळमकर, भीमराव माने, मनोज गायकवाड, रामदास माने, संतोष ढोरे पाटील, राजेंद्र शिंदे, शंकर बारवे यांनीही मनोगत मांडले. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संजीव कुलगोड यांनी आभार मानले.
Related
Articles
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
बुमराची गोलंदाजी पाहण्याची सचिनला उत्सुकता
21 Jun 2025
नव्या युद्धामुळे चिंता
22 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
बुमराची गोलंदाजी पाहण्याची सचिनला उत्सुकता
21 Jun 2025
नव्या युद्धामुळे चिंता
22 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
बुमराची गोलंदाजी पाहण्याची सचिनला उत्सुकता
21 Jun 2025
नव्या युद्धामुळे चिंता
22 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
बुमराची गोलंदाजी पाहण्याची सचिनला उत्सुकता
21 Jun 2025
नव्या युद्धामुळे चिंता
22 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
5
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
6
पुण्यातील सराईत गुन्हेगार