E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
Wrutuja pandharpure
19 Jun 2025
डब्यामागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढ
पुणे
: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका विविध प्रकारच्या खाद्यतेलाला बसला आहे. घाऊक बाजारांत सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी, तर पंधरा लिटर आणि किलोच्या डब्याच्या दरात ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. दोन्ही देशातील संघर्ष वाढत गेल्यास तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांत तेलाचे दर वाढले असल्याची माहिती व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली.
नहार म्हणाले, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाच्या दरात अभूतपूर्व तेजी निर्माण झाली आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरांत वाढ झाली आहे. कच्चा आयाती तेलावरील आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी केल्यामुळे सर्वच खाद्यतेलांच्या दरात घसरण झाली होती. सध्या तेलाची मागणी कमी आहे. मात्र, इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे खनिज तेलाच्या किंमती बॅरलमागे सहा डॉलर्सनी वाढल्या आहेत. त्यामुळे आयाती खाद्यतेलांच्या किंमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व खाद्यतेलांच्या दरात १५ किलो आणि लिटरच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.
नारळाचे उत्पादन घटल्याने खोबरेल तेलाचेही दर वाढले आहेत. गोटा खोबर्याचे दर वाढल्यामुळे खोबरेल तेलाच्या २५ किलोच्या डब्याचा दर ६००० रुपयांवर पोहोचला आहे. दर उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे सध्या बाजारात खोबरेल तेलाची आवक जवळपास थांबली आहे. मागणी अभावी वनस्पती तुपाच्या दरात ५० रुपयांनी घट झाली होती. मात्र, हे दर पुन्हा वाढले असल्याचेही रायकुमार नहार यांनी स्पष्ट केले.
दर कमी होण्याची शक्यत कमीच
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांत किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा किलो किंवा लिटरच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता किंमती लवकर कमी होण्याची शक्यता नाही.
- रायकुमार नहार, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर.
घाऊक बाजारातील १५ किलो व लिटरच्या डब्याचे दर
तेल
दर
सोयाबीन तेल
१८६० ते २०६० रुपये
पाम तेल
१९३५ ते २१६० रुपये
शेंगदाणा तेल
२२०० ते २४०० रुपये
सूर्यफूल तेल
१९८० ते २१३० रुपये
सरकी तेल
१९५० ते २२०० रुपये
वनस्पती तूप
१८५० ते २२०० रुपये
Related
Articles
बुमरा दुसरी कसोटी खेळणार : रयान टेन डोशेट
02 Jul 2025
वन विभागाला आर्थिक सक्षम करणार
28 Jun 2025
अवघी बारामती झाली विठ्ठलमय
27 Jun 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
बुमरा दुसरी कसोटी खेळणार : रयान टेन डोशेट
02 Jul 2025
वन विभागाला आर्थिक सक्षम करणार
28 Jun 2025
अवघी बारामती झाली विठ्ठलमय
27 Jun 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
बुमरा दुसरी कसोटी खेळणार : रयान टेन डोशेट
02 Jul 2025
वन विभागाला आर्थिक सक्षम करणार
28 Jun 2025
अवघी बारामती झाली विठ्ठलमय
27 Jun 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
बुमरा दुसरी कसोटी खेळणार : रयान टेन डोशेट
02 Jul 2025
वन विभागाला आर्थिक सक्षम करणार
28 Jun 2025
अवघी बारामती झाली विठ्ठलमय
27 Jun 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
केरळचा आदर्श
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप