मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा   

वसंत मोरे यांचा आरोप

पुणे : विधानसभेच्या निवडणुकांपुर्वी शिवसेनेचे फुलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. याबाबतचे छायाचित्रण देखील मोरे यांनी समाज माध्यमांवर प्रसिध्द केले आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा गंभीर आरोप केला आहे.  गोगावले यांच्या आरोपा नंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
बाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी १७ ऑक्टोबर २०२४ ला मध्यप्रदेश मधील बागला मुखी उज्जैन येथे असलेल्या देवीच्या मंदिरातून भरत गोगावले यांनी काही पुजार्‍यांना पाचरण केले होते. त्या पुजार्‍यांच्या मार्फत घरामध्ये मोठी आघोरी पूजा घालण्यात आली.ही अघोरी पूजा करण्यासाठी भरत गोगावले यांनी अकरा महाराजांना पाचरण बोलावले होते, त्या अकरा महाराजांकडून घरामध्ये मोठी पूजा करून घेण्यात आली. तसेच त्या अकरा महाराजांची पूजा देखील गोगावले यांनी केली असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.त्यामुळे आता आम्ही भरत शेठ गोगावले यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तक्रार करणार आहोत. जर तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का ? विश्वास असेल तर अशा अघोरी पूजा का ?केली असा  सवाल यावेळी वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.
 
पुढे वसंत मोरे म्हणाले, अघोरी पूजा करण्यासाठी ओम फट स्वाहा जे करतात त्यांना आणले जाते. महाराष्ट्रातले अनेक नेते तिथे जातात तब्बल १५ लाख रुपये एका पूजेला लागतात असा’, आरोप सुद्धा वसंत मोरे यांनी केला आहे.विधानसभा निवडणूक  २० नोव्हेंबर रोजी होती, त्यापूर्वी १ महिना भरत गोगावले यांनी  त्यांच्या घरात ही पूजा करण्यात आली. आता अशा पूजा जर होणार असतील तर आम्ही याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत तक्रार करणार आहोत असे वसंत मोरे म्हणाले.
--------------

Related Articles