E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कस्पटे कुटुंबीयांकडे वैष्णवीचे बाळ सुपूर्द
Wrutuja pandharpure
23 May 2025
पिंपरी
: मुळशी तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरके झाले होते. आईच्या मृत्यूनंतर ते बाळ राजेंद्र हगवणे यांच्या परिचयाचे निलेश चव्हाण यांच्याकडे असल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. अखेर हे बाळ गुरूवारी वैष्णवीच्या आई-वडिलांकडे म्हणजे कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. एका अनोळखी व्यक्तीने हे बाळ ताब्यात दिले, असे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना अनिल कस्पटे म्हणाले, एका अनोळखी व्यक्तीचा माझ्या भावाला दूरध्वनी आला होता. त्या व्यक्तीने आमचे बाळ बाणेरजवळ आमच्याकडे सोपवले आणि ते तिथून निघून गेले. ते कोण होते, याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. आमचे बाळ आमच्याकडे आले, याचा आम्हाला आनंद आहे. बाळाच्या रुपात आम्ही आमच्या लेकीला पाहात आहोत. आम्ही वैष्णवी म्हणूनच तिच्या बाळाचा पुढे सांभाळ करणार आहोत, असे सांगतानाच राजेंद्र हगवणे यांना तात्काळ अटक करा. त्याच्याविरोधात कारवाई करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीचे बाळ तिच्या वडिलांकडे सोपवण्यात यावे, असे आदेश दिले होते. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. या दोन्ही कस्पटे यांच्या वाकड येथील घरी पोहोचल्या होत्या. मात्र, ते बाळाला घ्यायला निघणार, तेवढ्यात कस्पटे यांच्या घरी एका व्यक्तीचा दूरध्वनी आला आणि त्याने बाळाला भावाकडे सोपवल्याचे कस्पटे यांनी सांगितले.
वैष्णवीचे बाळ आधी त्याच्या आत्याकडे होते. यानंतर ते बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आले होते. निलेशने ते बाळ अण्णा पवळे आणि अमित पवळे यांच्याकडे दिले होते. अण्णा पवळे हे हगवणे यांचे नातेवाईक आहेत. वैष्णवीचे बाळ तीन दिवस पवळे कुटुंबीयांकडे होते. यानंतर आता हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आले आहे.
Related
Articles
खलिस्तानी कॅनडात रचताहेत भारतविरोधी कारस्थान
20 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
देहूनगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
खलिस्तानी कॅनडात रचताहेत भारतविरोधी कारस्थान
20 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
देहूनगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
खलिस्तानी कॅनडात रचताहेत भारतविरोधी कारस्थान
20 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
देहूनगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
खलिस्तानी कॅनडात रचताहेत भारतविरोधी कारस्थान
20 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
देहूनगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला